सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी

लातूर : यावर्षी खरिप हंगामातील सोयाबीन प्रमुख पीक आहे. परंतु केंद्र सरकारने सोया पेंड आयात करण्यास परवानगी दिली आहे. त्याची वेळही वाढून देण्याची मागणी सुरू आहे. याचा परिणाम सोयाबीन दरावर होत आहे. त्यास काल पुर्णविराम मिळाला असून स्वतः वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी सोया पेंड खरेदीचा केंद्राचा विचार नाही असे ट्विट केले. त्यामुळे आता सोयाबीनचे दर वाढण्याची शक्यता असून ही शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी आहे.
महाराष्ट्र सोयाबीन उत्पादनात देशात अग्रेसर आहे . यातून शेतकऱ्यांनाही दोन पैसे अधिक मिळतं आहेत. परंतु पोल्ट्री व्यावसायिकांनी कोंबड्याच्या उत्पादन खर्चात मोठी वाढ होत असल्याचे सांगताना लॉबिंग करून सोया पेंड आयात करण्याची मागणी केली. या मागणीला मान्य करत केंद्राने १२ लाख मेट्रिक टन सोया पेंडीच्या आयतीचा निर्णय घेतला. त्यापैकी साडे सहा लाख मेट्रिक टन सोया पेंड आयात झाली आहे . उर्वरित सोया पेंड आयात करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ द्यावी अशी मागणी मागील काही दिवसांपूर्वी करण्यात आली. केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री पुरूषोत्तम रुपाला यांनी विदेश व्यापार महासंचालक यांना पत्राद्वारे ३१ मार्चपर्यंत वाढ द्या असे सांगितले होते. त्यानंतर सोयाबीनचे दर घसरण्यास सुरू झाले. ७ हजार १०० पर्यंत गेलेला दर ६ हजार २०० आणि ४०० वर आलं. याचा शेतकऱ्यांना फटका बसला आहे. हे नुकसान पाहून शेतकरी नेते पाशा पटेल यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन पोल्ट्री व्यावसायिकांची मागणी आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान याची सविस्तर माहिती दिली. त्यांना निवेदनाद्वारे मागणी केली. यावर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी सोया पेंडीच्या आयातीचा केंद्राचा विचार नाही असं ट्विट केल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे . आता सोयाबीनचे दर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.