धक्कादायक! बीड जिल्ह्यात गोळीबार एक गंभीर जखमी

लोकगर्जना न्यूज
काम थांबल्याने आनंद साजरा करणाऱ्या तरुणावर एका परप्रांतीय व्यक्तीने मारहाण करत गोळीबार केला. यामध्ये एकजण गंभीर जखमी झाला. सदरील घटना तालखेड ( ता. माजलगाव ) येथे घडली आहे. गोळीबार करणाऱ्यास ग्रामस्थांनी पकडून चांगलाच चोप दिला आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तालखेड येथील काही तरुण साखर कारखान्याचे काम थांबल्याने नाचत आनंद साजरा करत होते. यावेळी अचानक एक जीप आली. त्यामध्ये तीन ते चार व्यक्ती होते. त्यांनी आनंद साजरा करणाऱ्या तरुणांना मारहाण केली. एकाने गोळीबार केला. यामध्ये साहेबराव जाधव हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्यास तातडीने दवाखान्यात हलविण्यात आले. गोळीबार झाल्याची घटना गावकऱ्यांना समजताच त्यांनी रस्त्यावर ट्रॅली आडवी लावून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या गोळीबार करणाऱ्यांची जीप आडवली. जमलेल पुर्ण गाव पाहून इतरांनी धुम ठोकली परंतु एकजण हाती लागला. त्यास ग्रामस्थांनी चांगलाच चोप दिला आहे. या घटनेने मात्र तालखेड परिसरात खळबळ माजली आहे