शेतकऱ्यांनो केवळ चार दिवस शिल्लक:हे काम करा अन्यथा हरभरा ( चना ) विक्रीसाठी येतील अडचणी!

लोकगर्जनान्यूज
बीड : रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात हरभरा ( चना ) पीक शेतकऱ्यांनी घेतलं आहे. शासकीय हमीभाव केंद्रांवर इतरांच्या तुलनेत हरभऱ्याला अधिक दर मिळतो. तुम्ही जर हमीभाव केंद्रांवर हरभरा विकण्याचा विचार करत असाल अन् हे काम अद्याप केले नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. यासाठी आता केवळ चार दिवस तुमच्या हातात आहेत.
शासनाने ई-पीक पहाणीची तारीख वाढविली असून यासाठी ३१ जानेवारी शेवटची तारीख निश्चित करण्यात आली. ही तारीख वाढविण्याची दुसरी वेळ असल्याने आता पुन्हा तारीख वाढविण्याची शक्यता कमी आहे. ई-पीक पाहाणी करणं प्रत्येक शेतकऱ्याला आवश्यक आहे. या शिवाय सातबारावर पिकांची नोंद होणार नाही. म्हणजे पर्यायाने आपली जमीन कागदोपत्री पडीक समजली जाईल. यामुळे शेतकऱ्यांना पीककर्ज,पीक विमा तसेच आता खरीप हंगामातील हरभरा ( चना ) हे सर्वाधिक असल्याने म्हत्वाच पीक आहे. या पिकास बाहेरील बाजाराच्या तुलनेत शासनाच्या हमीभाव केंद्रांवर जास्त दर मिळतो. यामुळे शक्यतो शेतकरी हरभरा ( चना ) हमीभाव केंद्रांवर विक्रीला प्राधान्य देतो. येथे हरभरा विकण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करावी लागते. त्यासाठी ई-पीक पाहाणी आवश्यक आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-पीक पाहाणी केली नाही अशा सर्व शेतकऱ्यांनी ३१ जानेवारी पर्यंत ई-पीक पहाणीची मोबाईल ॲपवरून ऑनलाईन पद्धतीने करुन घ्यावी असे आवाहन शेतकऱ्यांना केज तहसील कार्यालया कडून प्रशासनाकडून करण्यात येत आहे.