तत्वनिष्ठ उध्दव ठाकरे: रत्नाकर शिंदे जिल्हाप्रमुख पदावरून तडकाफडकी हटविले

लोकगर्जनान्यूज
बीड : केज तालुक्यातील कला केंद्रा आडून वेश्याव्यवसाय होत असल्याचे पोलीस छाप्यात उघड झाले. यामध्ये जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे यांचा आरोपींमध्ये समावेश असल्याचे समजताच याची गंभीर दखल घेऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून तडकाफडकी हटविण्यात आले. पक्षाची पडझड सुरू असतानाही पक्षप्रमुखांनी तत्वाशी तडजोड न करता कारवाई केल्याने उध्दव ठाकरे यांच्या निर्णयाचे कौतुक करण्यात येत आहे.
केज पोलीस ठाणे हद्दीतील कला केंद्रावर छापा टाकला यावेळी पोलिसांना अनेक धक्कादायक बाबी दिसून आल्या. या छापेमारीत आढळून आलेल्या एकूण 36 महिला,पुरूषांवर गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींमध्ये शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे यांचा समावेश असल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली. याची माहिती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मिळाली. याची गंभीर दखल उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून रत्नाकर शिंदे यांना जिल्हाप्रमुख पदावरुन तातडीने पदमुक्त करण्यात आले. सचिव खा. विनायक राऊत यांच्या स्वाक्षरीच्या प्रसिध्दीपत्रकातून माहिती दिली. पक्षाची सध्या पडझड सुरू असून, अनेकजण दुसरीकडे उड्या मारत आहेत. एक-एक पदाधिकाऱ्याची पक्षाला गरज आहे. याही परिस्थितीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे तत्वनिष्ठ असल्याचे स्पष्ट झाले असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.