आपला जिल्हा

पोलीस शिपाई चालक भरती

 

लेखी व मैदानी चाचणी गुणांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध

बीड : जिल्हा पोलीस चालक पोलीस शिपाई २०१९ मधील १२७ उमेदवारांनी दिलेल्या लेखी व मैदानी चाचणी गुणांची यादी बीड पोलीसांच्या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याची माहिती पोलीस अधीक्षक बीड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

पोलीस अधिक्षक बीड यांचे आस्थापनेवरील रिक्त असलेल्या चालक पोलीस शिपाई ( ३६ ) पदांची भरती प्रक्रीयेमध्ये वाहन चालक कौशल्या चाचणीमध्ये पात्रं ठरलेल्या १२७ उमेदवारांची लेखी व मैदानी चाचणी घेण्यात आली. यामध्ये प्राप्त गुणांची यादी www.beedpolice.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे . या यादीतील प्राप्त गुणांबाबत उमेद्वारांना काही आक्षेप असल्यास त्यांनी आपले म्हणणे लेखी स्वरुपात मांडण्यासाठी आवश्यक कागदपत्रासह दिनांक १४ / १२ / २०२१ सकाळी १० ते दुपारी ०३ वाजेपर्यंत पोलीस मुख्यालय , बीड येथे समक्ष हजर रहावे असे आवाहन करण्यात आले.तसेच उमेदवारांना काही अडचण असल्यास हेल्पलाईन नंबर ०२४४२-२९५३३३ वर सकाळी १० वाजल्यापासुन सांयकाळी ५ वाजेपर्यंत संपर्क साधावा. असे आवाहनही पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »