भावंडांबरोबर खेळत असलेल्या चिमुकलीवर काळाची झडप; परळी तालुक्यातील हृदयद्रावक घटना

लोकगर्जना न्यूज
परळी : आपल्या भावंडांबरोबर खेळत खेळत राखेच्या तलावात पडून चार वर्षिय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना येथील औष्णिक विद्युत केंद्र परिसरात आज गुरुवारी ( दि. २५ ) सकाळी घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
साक्षी साईनाथ पवार ( वय ४ वर्ष ) असे मयत चिमुकलीचे नाव आहे. येथील औष्णिक विद्युत केंद्रातून निघणाऱ्या राखेच्या साठवणूकीसाठी तलाव तलाव आहे. या तलावा पासून काही अंतरावर पवार कुटुंब रहाते. आज सकाळी तीन लहान -लहान भावंडे खेळत -खेळत या राखेच्या तलावा जवळ आले. यावेळी साक्षी व तीची बहीण या राखेच्या तलावात पडल्या यामध्ये पावसामुळे पाणी साचले आहे. त्यात बुडू लागल्या हे पहाताच ७ वर्षांच्या भावाने घरी जाऊन वडीलांना माहिती दिली. त्यांनी पळत येऊन मुलींना बाहेर काढले. परंतु तोपर्यंत साक्षी हीजा मृत्यू झाला. एकजण सुखरूप आहे. सकाळच्या सुमारास पवार कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळले असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.