st bus- चार दिवसांत धारुर आगारातील एक चालक व वाहकाची आत्महत्या; कारण काय?
लोकगर्जनान्यूज
धारुर : येथील राज्य परिवहन महामंडळाच्या आगारातील एका st bus चालकाने चार दिवसांपूर्वी आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच काल गुरुवारी एका वाहकाने आपलं आयुष्य संपवल्याने एकच खळबळ माजली आहे. महाविकास आघाडी शासनाच्या काळात या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी मोठं आंदोलन केलं. परंतु आणखीन त्यांचे प्रश्न सुटले नाहीत म्हणून या आत्महत्या होत आहेत की, इतर काही कारण आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पगार, कामाचा ताण व अनेक समस्यांच्या विळख्यात राज्य परिवहन महामंडळ व चालक,वाहक अडकलेले आहेत. या समस्या सोडविण्यात याव्यात म्हणून st bus कर्मचाऱ्यांनी मोठं व ऐतिहासिक आंदोलन केले. त्यावेळी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर होते. आणि विरोधात असलेले भाजपा तेव्हा या st bus या कर्मचाऱ्यांची काळजी करत होतं. भाजपा सत्तेत येऊन वर्ष झाले आहे तरीही रा.प.म. st bus कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटलेले दिसतं नाही. तसेच आत्महत्याही थांबलेल्या नाहीत. धारुर ( जि. बीड ) येथील आगारातील किशोर केंद्रे या st bus चालकाने चार दिवसांपूर्वी आत्महत्या केली. ही घटना अद्याप सहकारी विसरले नाहीत तोच गुरुवारी ( दि. 15 ) याच धारुर आगारात वाहक असलेले महादेव ज्ञानोबा धस ( वय 35 वर्ष ) रा. सांगवी सारणी ता. केज यांनी आपल्या गावीच एका आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. चार दिवसात एकाच आगारातील दोघांनी आयुष्य संपवल्याने बीड जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. या आत्महत्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.