st bus – एसटीने प्रवास करताय? प्रवाशांनो सावधान शारिरीक इजा होण्याची भीती!
लोकगर्जनान्यूज
अंबाजोगाई : रा.प.महामंडळची एसटी बस ( st bus ) म्हणजे महाराष्ट्राची लाल परी परंतु ही आता अनेक समस्यांना तोंड देत आहे. याचे काचा तुटलेल्या असून पत्रा जागोजागी फाटलेला आहे. आज शनिवारी ( दि. १३ ) डॉ. हनुमंत सौदागर हे अंबाजोगाई येथून परळीला जाताना सीटच्या बाजुला पत्रा फाटलेला फोटो घेतला. जर बसताना प्रवाशांचे याकडे लक्ष गेले नाहीतर मोठी जखम होऊन शारीरिक इजा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अंबाजोगाई – परळी मार्गावर एसटीने ( st bus ) प्रवास करत असाल तर सावधान व्हा असे प्रवाशांना आवाहन करण्यात येत आहे.
महाराष्ट्रातील वाडी,वस्ती, तांड्यावर पोचलेली राज्य परिवहन महामंडळाची एसटी आहे. दररोज लाखो प्रवाशांना इच्छा स्थळीं पोहचविण्यासाठी एसटी,बस ( st bus ) शिवाय खात्रीची व सोयीचे दुसरं कोणतंही साधन नाही. यामुळे महाराष्ट्रात एसटीला लाल परी म्हटले जाते. परंतु ही लाल परी आता जीर्ण झालेली दिसत आहे. हा नेमका परिणाम वयाचा आहे की, तीची निगा अथवा सांभाळ व्यवस्थित होत नाही याचा आहे. हे काही समजत नाही. अनेक आगाराच्या रस्त्यावर धावणाऱ्या एसटी पाहिल्यातर अधिक खिडक्या तुटलेल्या, पत्रा फाटलेला, सीट तुटलेली, खडखड,धडधड आवाजाच्या या गाड्या दिसून येतात. शनिवारी ( दि. १३ ) सामाजिक कार्यकर्ते डॉ. हनुमंत सौदागर हे सायंकाळी अंदाजे ५ ते ५:१५ वाजता अंबाजोगाई येथून परळी कडे जाण्यासाठी एसटी बस ( st bus ) क्रमांक MH 07 C 7601 या अंबाजोगाई आगाराच्या अंबाजोगाई-परळी बसमध्ये बसले. गर्दी खूप असल्याने दोन प्रवासी बसण्याचा सीट असलातरी तिघे बसू म्हणून खिडकीकडे बसलेल्या आजींना सरकण्यास सांगितले परंतु त्यांनी टोचायलं म्हणून सरकण्यास नकार दिला. काय टोचतंय म्हणून पाहिले असता तेथील पत्रा फाटून तो सीट पर्यंत आलेला होता. जर त्या आज्जींनी लक्ष दिले नसते तर त्यांना नक्कीच दुखापत झाली असती. त्यामुळे अंबाजोगाई -परळी रस्त्यावर एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना शारिरीक इजा पोहचू नये म्हणून सावधान करण्यात येत आहे. तर एसटी महामंडळाने आतल्या बाजुने तरी गाड्या व्यवस्थित ठेवाव्यात अशी रास्त अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पूर्ण तिकीट देऊन ही प्रवासात मरणयातना सोसाव्या लागतात
सीटच्या शेजारील पत्रा फाटल्याने वयोवृद्ध नागरिकांना मोठी जखम होऊ शकते, हा धोका टाळण्यासाठी महामंडळाने बस आतल्या बाजूने दुरुस्त करायला हव्यात.
सामाजिक कार्यकर्ते डॉ हनुमंत सौदागर,केज