Ssc Result 2023- उद्या इयत्ता 10 बोर्ड परीक्षेचा निकाल
लोकगर्जनान्यूज
इयत्ता 10 बोर्डच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना ज्याची प्रतीक्षा होती ती घडी जवळ आली आहे. उद्या शुक्रवारी ( दि.2 ) 10 बोर्ड ( Ssc Result 2023 ) ऑनलाईन निकाल लागणार असल्याची घोषणा महाराष्ट्र बोर्डाने केली आहे.
इयत्ता 12 ( Hsc ) चा निकाल लागल्यानंतर इयत्ता 10 ( Ssc ) परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना निकाल कधी लागणार याची उत्सुकता होती. 10 बोर्ड परीक्षेचा निकाल उद्या शुक्रवारी ( दि. 2 ) दुपारी 1 वाजता महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने हा निकाल अधिकृत वेबसाइटवरून पहाता येईल असे म्हटले आहे. 10 ची परीक्षा ही प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी पहिली बोर्ड परीक्षा असल्याने या निकालाची विद्यार्थी,पालक यांना उत्सुकता असते. हा एक टर्निंग पॉइंट मानला जातो विद्यार्थी हे शालेय जीवनातून कॉलेज मध्ये पदार्पण करणार असतो हे ही एक आकर्षण असल्याने 10 निकालाची उत्सुकता असते. ही उत्सुकता आता संपली असून उद्या निकाल लागणार आहे.