SSC, HSC 2023 Result? 10,12 बोर्ड परीक्षांचा निकाल या तारखेला?
लोकगर्जनान्यूज
बीड : सध्या माध्यमिक व उच्च माध्यमिक SSC, HSC BOARD EXAM परीक्षा सुरू आहेत. मध्यंतरी निकाल उशिरा लागणार असे सांगितले जात होते. परंतु बोर्डाने ( Board ) वेळेतच निकाल ( SSC, HSC 2023 Result? ) लागेल असे सांगितले असून, दहावी, बारावी या दोन्हीचे निकाल जून महिन्यात लागतील अशी शक्यता आहे.
गतवर्षी कोरोनामुळे प्रत्येक शाळेवर 10,12 च्या परीक्षा पार पडल्या होत्या. याचा पारडल्याने अनेक विद्यार्थ्यांना लाभ झाला. परंतु यावेळी कोरोणाचे संकट नसल्याने केंद्रांवर परीक्षा झाल्या तसेच परीक्षा मंडळाने कॉपी मुक्ती कडे लक्ष केंद्रित केले. यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत शुटींग करण्यात आले. तसेच बेठे पथक, फिरते पथक तैनात होते. यासाठी जिल्हा परिषद,. महसूल कर्मचारीही सहभागी करुन घेत अचूक नियोजन करुन हुशार विद्यार्थ्यांना न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. तरीही काही ठिकाणी पेपर फुटीचे प्रकार घडल्याचे या परीक्षांना गालबोट लागले आहेत. यानंतर 12 ( HSC ) च्या उत्तर पत्रिका तपासणीवर बहिष्कार अन् पुन्हा यानंतर जुनी पेन्शन मागणी यासाठी झालेल्या आंदोलनाचा निकालावर परिणाम होणार? दहावी, बारावी ( SSC, HSC 2023 Result ) चा निकाल उशिरा लागणार असे सांगितले जात होते. परंतु बोर्डाने वेळेत निकाल लावण्याचे प्रयत्न असून, इयत्ता 10 SSC चा निकाल ( Result ) ( दि. 10 ) जून पर्यंत तर 12 ( HSC ) चा निकाल ( Result ) ( दि. 2 ) जून पुर्वी घोषित होईल असे सांगितले जात आहे. त्यामुळे SSC, HSC 2023 Result वेळेत लागणार असे दिसून येत असल्याने विद्यार्थी व पालकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.