भवताली

Spam calls-स्पॅम कॉल कसे बंद करावे? या आहेत टिप्स

लोकगर्जनान्यूज

प्रत्येक फोन वापर करता स्पॅम कॉल ( Spam calls ) ने बेजार असून, असे कॉल जवळपास बंद करण्याचे पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये मोबाईल सेटिंग सह काही ॲप्सची सहाय्यता आपण घेऊ शकतो. असे कॉल रोखण्यासाठी काय टिप्स आहेत हे जाणून घेण्यासाठी ही बातमी पुर्ण वाचा.

स्मार्ट फोनमुळे अनेक कामे सोपी झाली असून आपण या फोनच्या माध्यमातून संपर्क साधण्यासोबत इतरही ऑनलाईन कामे करु शकतोत. परंतु सध्या स्पॅम कॉल ( Spam calls ) डोकेदुखी वाढली आहे. हे कॉल्स जवळपास कमी अधिक प्रमाणात प्रत्येक फोनवर येतात. यामुळे आपला वेळ वाया जातो तसेच आपण काही कामात व्यस्त असतो अन् फोनची बेल वाजते. कोणाचा म्हत्वाचा फोन असेल म्हणून आपण फोन घेतो तर समोरुन भलतंच काहीतरी ऐकण्यात येते. याचा आपल्याला राग येतो. या स्पॅम कॉल ( Spam calls ) मुळे आपलं कधी आर्थिक नुकसान होत. यामुळे हे कॉल बंद करणे आवश्यक आहे. यासाठी खालील टिप्सचा आधार घ्या
Fully block असा मेसेज करा
स्पॅम कॉल ( Spam calls ) रोखण्यासाठी शासनाने ट्रायच्या माध्यमातून 1909 या नंबरवर Fully block असा मेसेज टाईप करुन पाठवायचा आहे. असा मेसेज केल्यानंतर काही दिवसांत आपल्या मोबाईलवर येणारे ( Spam calls ) व फेक कॉल्स ( fake call ) 90 टक्के पर्यंत बंद होतील.
यासाठी DND ॲपचा आधार घेऊ शकता
ट्राय या शासकीय संस्थेने स्पॅम कॉल ( Spam calls ) रोखण्यासाठी DND ॲप आणलं आहे. हा ॲप प्लेस्टोर वरुन डाऊनलोड करुन सांगेल त्या प्रमाणे सेटिंग करुन ॲप चालू करा. यानंतर स्पॅम कॉल थांबतील.
( Spam calls ) कसे ओळखाल?
आपल्या फोनवर स्पॅम कॉल कसे ओळखावे या कॉलर आयडी ॲप हा पर्याय आहे. कोणताही कॉलर आयडी ॲप मोबाईलमध्ये डाऊनलोड करा. यामुळे आपल्याला येणारा नवीन ( unknown number ) ची तो माहिती देईल आणि आपण सहजच हा कोणाचा कॉल आहे हे ओळखता येईल अन् आपण तो कॉल घेणार नाही.
ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर पुढेही शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »