क्राईम

Beed Lcb ची मोठी कारवाई:अंबाजोगाई करांची झोप उडवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

तब्बल आठ घरं फोडल्याची कबुली

लोकगर्जनान्यूज

अंबाजोगाई : शहरात पाळत ठेवून बाहेरुन बंद असलेले घरफोडून आतील रोख रक्कम, दागिने सह विविध वस्तू चोरुन नेहणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत बीड स्थानिक गुन्हे शाखा ( Beed Lcb ) ने दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून चोरलेले दागिने, रोख रक्कम आदि मुद्देमाल जप्त केला. चोरट्यांनी शहरात तब्बल 8 घरफोड्या केल्याचे कबुल केले. दोन आरोपींचा शोध सुरू आहे.

अंबाजोगाई शहरात दिवसा असो की, रात्री पाळत ठेवून जो घर बाहेरुन बंद आहे तो घर फुटलेच समजा. या घटनांनी शहरवासीयांमध्ये एकप्रकारे दहशत निर्माण झाली. हे चोरटे इतके चालाक आहेत की, ज्या घरात कोणीच नाही, जो बाहेरुन बंद आहे त्याच घरांना टार्गेट करत असे. यामुळे काही पुरावाच मिळत नव्हता पण पोलीस के हात लंब्बे होते है उगाच म्हणत नाहीत. या गुन्ह्याचा तपास करत असताना बीड स्थानिक गुन्हे शाखा ( Beed Lcb ) ला गुप्त माहिती मिळाली असता त्यावरुन Beed Lcb ने अझर अब्दुल पठाण रा. पेंनशनपुरा ( अंबाजोगाई ), जीवन प्रभाकर साळुंखे रा. क्रांतीनगर ( अंबाजोगाई ) या दोघांना ताब्यात घेतले. यांच्याकडून दागिने, रोख रक्कम, टिव्ही, लॅपटॉप असा मुद्देमाल जप्त केला. त्यांच्याकडे चौकशी केली असता या दोघांनी व दुसरे दोघे असे चौघांनी मागील 7 महिन्यात साकुडरोड, भिमाई नगर, जोगाईवाडी शिवार, खडकपूर, राजीव गांधी चौक, सह्याद्री नगर, मोरेवाडी, भगवान बाबा चौक, अशोकनगर शहरातील या भागात तब्बल 8 घरफोड्या केल्याचे सांगितले. आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपींनी अविनाश शंकर देवकर रा. वडारवाडा ( अंबाजोगाई ), राहुल प्रल्हाद बनसोडे रा. मुकुंदराज कॉलनी ( अंबाजोगाई ) हे सहभागी होते अशी माहिती दिली. त्यांचा पोलीस शोध घेत आहेत.
बीड शहरातील घरफोड्या उघडकीस
बीड शहरातील घरफोडी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा, बीड ( Beed Lcb ) राम बन्सी नवले रा. आहेर धानोरा ( ता.बीड ) या संशयिताला ताब्यात घेतले आहे. त्याकडे चौकशी केली असता त्यानें बीड शहरात आठ ते दहा घरफोड्या केल्याचे कबुल केले. चोरलेले दागिने हे शहरातील सराफा कडे दिल्याचे सांगितले आहे. या दोन्ही कारवाया वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने ( Beed Lcb ) केल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »