आमदार मुंदडा यांच्यामुळे शेतकऱ्यांची विजेची अडचण बऱ्यापैकी झाली दूर
८० कोटींच्या निधीतून झाली विविध कामे

लोकगर्जनान्यूज
केज : तालुक्यातील शेतकऱ्यांची विजे संबंधी नेहमीच तक्रार होती. यासाठी आमदार नमिता मुंदडा यांनी नियमित पाठपुरावा करुन तब्बल ८० कोटींचा निधी खेचून आणला. यातून विजेची अनेक कामे केली. काही ३३/११ केव्ही केंद्रांच्या ठिकाणी अतिरिक्त ५ एमव्हीए चे मुख्य ट्रान्स्फर मंजूर करुन आणले आहेत. यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांची विजेची अडचण बऱ्यापैकी दूर झाली असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. यातील काही कामे झाली असून काही कामे प्रगतीपथावर आहेत.
विकासाची दृष्टी आणि उच्चशिक्षित, सामान्य जनतेच्या अडचणी जाणून सोडविण्याची धमक असणारा लोकप्रतिनिधी असला की, त्याचा सामान्य माणसाला कसा फायदा होतो हे पाहिचे असेल तर बीड जिल्ह्यातील केज मतदारसंघातील कामे पहावी लागेल, अंबाजोगाई, केज शहर अंतर्गत रस्ते, स्वाराती रुग्णालयाच्या इमारती, ग्रामीण भागातील अनेक रस्ते ही कामे अत्यंत चांगली झाली आहेत. परंतु विजे संबंधी शेतकरी सततच अडचणीत सापडलेला असतो या प्रश्नाकडे म्हणावं तसं कोणी लक्ष देत नाही. परंतु लोकांच्या अडचणीची जाणीव असणाऱ्या आमदार नमिता मुंदडा यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी या प्रश्नी लक्ष घातलं, कणखर भूमिका घेत नियमित पाठपुरावा केला. उर्जा खात्यातून केज तालुक्यासाठी तब्बल ८० कोटींचा निधी मंजूर करुन घेतली, यातून तालुक्यातील विविध कामे करुन घेतली आहे. काही ठिकाणी काम पूर्ण झाले आहे तर काही ठिकाणी काम प्रगतीपथावर आहेत. काही ३३/११ के.व्ही. विद्युत केंद्रांसाठी अतिरिक्त पाच एमव्हीए चे मुख्य ट्रान्स्फर मंजूर करुन घेतली आहेत. बऱ्याच ठिकाणी गावठाण फिडर वेगळे केले आहेत. गावांचा भार कमी होऊन शेतकऱ्यांना योग्य दाबाने वीज मिळत असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे काही प्रमाणात शेतकऱ्यांची विजेची अडचण बऱ्यापैकी दूर झाली आहे. सर्व कामे झाल्या नंतर हा प्रश्न कायमचा सुटणार आहे. यामुळे केज मतदारसंघातील मतदार पुन्हा म्हणत आहेत आमच्या आमदार नमिता मुंदडा.