दारुने केला घात! मुलाच्या मारहाणीत वडील ठार

लोकगर्जना न्यूज
केज : वडील नेहमीच दारु पितात म्हणून मुलाने दारुच्या नशेत मारहाण केली. यामध्ये जखमी वडीलांचा मृत्यू झाल्याची घटना युसुफ वडगाव ( ता. केज ) येथे घडली आहे. मुलगाही दारु पितो वडील ही तसेच त्यामुळे दारुने घात केल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
निवृत्ती कोंडीबा लगसकर ( वय ७० वर्ष ) रा. युसुफ वडगाव ( ता. केज ) असे मयताचे नाव आहे. नियमित दारु का पितात म्हणून मुलगा मल्हारी निवृत्ती लगसकर याने रविवारी ( दि. १२ ) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास मारहाण केली. यामध्ये पायाच्या नडगीवर मार लागला त्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे मृत्यू झाला असल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी पोपट लगसकर यांच्या फिर्यादीवरून मल्हारी लगसकर याच्या विरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला.