Soyabean Rate – आज सोयाबीन दरात इतकी वाढ शेतकऱ्यांना सुखद धक्का
लोकगर्जनान्यूज
बीड : शेतकऱ्यांना सोयाबीन दरवाढीची प्रतीक्षा असून, दर काही वाढत नसल्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. परंतु आज शनिवारी ( दि. 1 ) लातूर येथील एडीएम ( टीना ) मिलचे दर प्रतिक्विंटल 100 वाढले आहेत. बऱ्याच दिवसांनी चक्क 100 ने दर वाढल्याने हा शेतकऱ्यांसाठी सुखद धक्का असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. तसेच वाढ व्हावी अन्यथा कमी झाले तर हे एप्रिल फूल ठरेल अशीही चर्चा करण्यात येत आहे.
सोयाबीन उत्पादक अनेक शेतकऱ्यांनी गतवर्षीचे आणि या वर्षीचे सोयाबीन अद्याप विकलेले नाही.या शेतकऱ्यांना 7 हजार तरी दर मिळावा अशी अपेक्षा आहे. परंतु गतवर्षी पासून सोयाबीन दर घसरणीवर आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनचे खळे करुन थप्पी घरातच लावली आहे. माल विकण्यासाठी शेतकऱ्यांना फक्त दरवाढीची प्रतीक्षा आहे. परंतु दर वाढण्याचे काही नाव घेत नसून, उलट कमी होत आहे. 5 हजार व 5 हजार 200 ते 250 पर्यंत खाली घसरले होते. परंतु शनिवारी ( दि. 1 ) लातूर एडीएम ( टीना ) मिलचे दर प्रतिक्विंटल 5 हजार 350 होते. यांचे गुरुवारी ( दि. 30 ) 5 हजार 250 दर होते. एका दिवसात 100 रु. दर वाढले असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. परंतु हा नेमका परिणाम कशाचा हे काही स्पष्ट झाले नाही. त्यामुळे दरवाढ सुरु रहाणार की, घसरणार हे आता दोन दिवसांनंतर चित्र स्पष्ट होईल. कारण उद्या रविवार असल्याने अनेक ठिकाणी बाजार बंद असतात. त्यामुळे दर व बाजाराचे चित्र सोमवार,मंगळवारच्या व्यव्हारा वरुन चित्र समजेल. पण बऱ्याच दिवसांनी एकदम 100 उसळी हा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सुखद धक्का असल्याची चर्चा सुरू आहे.