soyabean-सोयाबीन 4700@ दोन वर्षांतील सर्वात निचांकी दर
लोकगर्जनान्यूज
बीड : सोयाबीन ( soyabean ) दर घसरत असून शुक्रवारी 4700 ते 4580 असा दर दिसून आलं. हा दर मागील दोन वर्षातील सर्वात निचांकी ठरला आहे. आता नवीन सोयाबीन बाजारात येणार असताना दर घसरल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
कापसावर विविध रोगांचा प्रादुर्भाव पडत असल्याने यातून शेतकऱ्यांना समाधानकारक उत्पन्न मिळत नाही. या पिकाला पर्याय म्हणून सोयाबीन ( soyabean ) पिकाला शेतकऱ्यांची प्रथम पसंती आहे. सन 2021 मध्ये सोयाबीन तब्बल 12 हजार रुपये प्रतिक्विंटल पर्यंत पोचते होते त्यानंतर शेतकऱ्यांचा लोंढा तिकडे गेला. परंतु सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे 12 हजारावरचे सोयाबीन गेल्यावर्षी तब्बल 7 हजिरांवर आले. यानंतर या दरात नेहमीच चढ उतार सुरू राहिले. दर वाढतील म्हणून अनेक शेतकऱ्यांनी दोन हंगामातील सोयाबीन घरात साठवून ठेवले आहे. पण दर वाढण्याचे नाव घेत नाही. मागील काही दिवसांपुर्वी सोयाबीन ( soyabean ) 5 हजार 500 प्रतिक्विंटल होते. यात घसरण होऊन शुक्रवारी ( दि. 6 ) 4 हजार 700 ते 4 हजार 580 पर्यंत खाली आला. हा दर मागील दोन वर्षातील सर्वात निचांकी ठरला आहे. यावर्षी आधीच पावसाने ताण दिल्याने सोयाबीनची ( soyabean ) अपेक्षीत वाढ झाली नाही. शेंगा भरण्याच्या काळात पाऊस नव्हता यामुळे सोयाबीन उत्पादन घटणार असे संकेत आहेत. तसेच नवीन सोयाबीन ( soyabean ) बाजारात येत असून, सध्या सर्वत्र सोयाबीन काढणीस वेग आला आहे. नेमकं याच काळात सोयाबीन दर कोसळल्याने दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक अडचणीत असलेला शेतकरी सोयाबीनचे ( soyabean ) घटते दर पाहून मेटाकुटीला आला आहे. दरात सुधारणा नाही झाली तर शेतकरी घटलेले उत्पादन आणि पडलेले दर अशा दुहेरी संकटात सापडून देशोधडीला लागणार असल्याचे चित्र दिसत आहे.
ते शेतकरी अधिक अडचणीत
12 हजारावरील दर चक्क 7 हजारांवर आल्याने दर वाढतील या आशेने अनेक शेतकऱ्यांनी दोन वर्षांपासून सोयाबीन ( soyabean ) घरात साठवून ठेवले आहे. दर वाढले की, विकायचं असा त्यांचा बेत होता. पण फासे उलटे पडत असून आता तर 4 हजार 700 व त्याहीपेक्षा कमी दराने सोयाबीन खरेदी होत आहे. दोन वर्षांत मालात झालेली तूट त्यात उंदीर,घुस यांनी केलेली नासाडी पहाता मोठे नुकसान झाल्याने हे शेतकरी अधिक अडचणीत सापडले आहेत.