silk farming-रेशीम रत्न पुरस्काराने होणार रेशीम उत्पादक शेतकऱ्यांचा गौरव;काय आहेत अटी?
एकरी एक लाखांचे उत्पन्न घेणाऱ्या शेतकरी निवडले जाणार
लोकगर्जनान्यूज
बीड : राज्यात रेशीम शेतीला silk farming चालना मिळण्यासाठी रेशीम उत्पादक शेतकऱ्यांचा शासनाकडून गौरव व्हावा यासाठी रेशीम संचालनालय पाठपुरावा करत होता. अखेर या प्रयत्नांना यश आले असून रेशीम उत्पादक शेतकऱ्यांचा ‘रेशीम रत्न पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात येणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांना रोख रक्कम देण्यात येणार आहे. पहिल्या वर्षी चार विभागांतील 612 शेतकऱ्यांना या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
रेशीम शेती silk farming ही शेतकऱ्यांच्या आयुष्यात आर्थिक क्रांती आणणारे, शाश्वत उत्पन्न देणारे पीक आहे. राज्यातील अनेक शेतकरी सध्या रेशीम शेती silk farming करत आहेत. अनेक शेतकरी एकरी 1 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न घेत आहेत. या शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे तसेच रेशीम शेतीचा प्रचार, प्रसार व्हावा राज्यातील अधिकाधिक शेतकरी रेशीम शेतीकडे silk farming वळावे या उद्देशाने रेशीम संचालनालय अनेक दिवसांपासून याचा पाठपुरावा करत होता. अखेर रेशीम संचालनालयाला यात यश आले. ( दि. 22 ) सहकार, पणन व वस्त्रोद्योग खात्याने आदेश काढला आहे. यामध्ये प्रथम पुरस्कार 11 हजार, द्वितीय 7 हजार 500, तृतीय 5 हजार अशी रक्कम जाहीर केली. या पहिल्या वर्षी अमरावती, छ.संभाजीनगर ( औरंगाबाद ) नागपूर, पूणे या चार विभागांतील 612 शेतकऱ्यांना गौरविण्यात येणार आहे. यासाठी 15 लाख 98 हजार रुपयांची तरतूद करण्यात आली. या पुरस्कारासाठी संबंधित शेतकऱ्यांना विहीत नमुन्यातील अर्ज जिल्हा रेशीम कार्यालयात करावा लागेल. एकरी 1 लाखांचे उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांची निवड रेशीम रत्न पुरस्कारासाठी करण्यात येणार आहे.
या आहेत अटी
रेषीम कोष उत्पादक शेतकरी असावा
रेशीम कार्यालयात नोंदणी आवश्यक
कोष विक्री पावती
100 अंडिपुजातून किमान 60 किलो कोष उत्पादन
संगोपन गृहाचे बांधकाम निकषानुसार असावं
तुती अथवा टसरची एक एकरात लागवड असावी
ही समिती निवडणार शेतकरी
रेशीम रत्न पुरस्कारासाठी शेतकरी निवडण्यासाठी रेशीम संचालकांच्या अध्यक्षतेखाली कृषी संचालक ( विस्तार ), रेशीम विभागाचे उपसचिव, जिल्ह्याचे रेशीम विकास अधिकारी अशी समिती असणार आहे.