आपला जिल्हा

sand online booking- 600 रु. ब्रास वाळूसाठी बुकिंग कशी करावी? बीड मध्ये डेपो सुरू

लोकगर्जनान्यूज

बीड : 600 रु. ब्रासने वाळू मिळणार आपण ऐकतो पण वाळू काही मिळत नाही. ही चर्चा ऐकणाऱ्या बीडकरांसाठी आनंदाची बातमी असून जिल्ह्याती 600 रु. ब्रासने वाळू देणारं पहिला डेपो सुरू झाला आहे. परंतु ही वाळू मिळवण्यासाठी ऑनलाईन बँकिंग ( sand online booking ) आवश्यक आहे. ते कशी करावी? डेपो कुठे सुरू झाला, वाळू आणण्यासाठी वाहन कुठं मिळणार याची माहिती मिळवण्यासाठी ही बातमी पुर्ण वाचा.

वाळूचा काळा धंदा मोठ्या प्रमाणात सुरू असून यातून जनतेची लूट सुरू आहे. मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा होत असल्याने वाळू माफियाही मोठ्या प्रमाणात निर्माण झाले आहेत. यासह अनेक गैरप्रकार बंद करून जनसामान्यांना कमी दरात म्हणजे 600 रु. ब्रास वाळू देण्याचा निर्णय शासनाने घेतला. याची राज्यात अंमलबजावणी काही ठिकाणी सुरू झाली असून राज्याच्या महसूल मंत्र्यांनी उद्घाटन करुन काही जिल्ह्यांत 600 रु. ब्रासने वाळू विक्री सुरू आहे. परंतु बीड जिल्ह्यात असा एकही डेपो अद्याप पर्यंत सुरू झाला नाही. त्यामुळे बीडकरांसाठी ही केवळ चर्चा ठरत होती. परंतु राक्षसभुवन ( ता. गेवराई ) येथे बीड जिल्ह्यातील पहिले 600 ब्रासने वाळू विक्री करणारा पहिला डेपो सुरू झाला. याचा शुभारंभ जिल्हाधिकारी ( collector ) दिपा मुधोळ-मुंडे यांच्या हस्ते ( दि. 14 ) सप्टेंबर झाले आहे. येथे आता वाळू विक्री सुरू झाली. 600 ब्रासने वाळू घ्यायची असेल तर यासाठी ( sand online booking ) ऑनलाईन बुकींग आवश्यक आहे. ही बुकिंग कशी करावी? हे आपण समजून घेऊ.
अशी करा ऑनलाईन बँकिंग ( sand online booking )
600 रु. ब्रासने वाळू मिळवण्यासाठी प्रथम ग्राहकाने mahakhanij.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन वरील बाजूस असलेल्या सॅन्ड बुकिंग ( sand booking ) वर क्लिक करा. यानंतर नवीन पेज उघडते येथे लॉगिनवर क्लिक करून कन्झूमर साईनअपवर ( Consumer Signup ) क्लिक करा. यानंतर नाव,फोन नंबर, ईमेल आयडी अशी आवश्यक माहिती भरावी. यानंतर आपली नोंदणी ( registration ) होईल. यानंतर आपला युझरनेम प्राप्त होईल. यानंतर जनरेट पासवर्डवर क्लिक करुन आपला नोंदणीकृत मोबाईल नंबर टाकावा यानंतर एक ओटीपी मिळेल तो टाकून आपला पासवर्ड तयार करावा.यानंतर लॉगिनवर जाऊन आपला युझरनेम, पासवर्ड, कॅप कोड टाकून लॉगिन करा. लॉगिन झाल्यानंतर आपला तालुका, जिल्हा, राज्य सह आपला पुर्ण पत्ता टाकावा. आधार, पॅन, राशनकार्ड आदि माहिती भरुन कागदपत्रे आपलोड करावी. या प्रमाणे वाळू ऑनलाईन बुकींग ( sand online booking ) करा.
प्रोजेक्ट ( बांधकाम प्रकार ) माहिती भरा
वरील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रोजेक्ट नोंदणी ( registration ) करण्यासाठी प्रोजेक्टची पुर्ण माहिती भरावी, पत्ता टाकावा तसेच बांधकामाचा प्रकार टाकावं. यावेळी गुगल मॅप वरील प्रोजेक्टस्थान टाकण्यास विसरु नका. हे सर्व भरल्यानंतर सबमिट करुन सॅन्ड बुक ( sand book ) या पर्यायावर क्लिक करताच वाळू डेपोची यादी समोर दिसेल. यावर जे डेपो जवळ आहे त्याची निवड करुन रक्कम ऑनलाईन पद्धतीने भरावी. यानंतर माय बुकिंगवर जाऊन पावती प्राप्त करुन घ्यावी. ही पावती डेपो वर दाखवावी तुम्हाला 600 ब्रासने वाळू मिळेल. तर डेपो पासून तुमच्या घरापर्यंत वाळू वाहतूकसाठी महाखनीज संकेतस्थळावर ट्रान्सपोर्टवर वाहन मिळेल. आपल्या आवडीनुसार आपण ट्रान्सपोर्ट निवडण्याचा अधिकार आहे.
एका व्यक्तीला किती मिळणार वाळू?
600 रुपये या दराने एका व्यक्तीला फक्त 5 ब्रास वाळू मिळणार आहे. यामुळे ज्यांना जास्त वाळू लागणार असेल त्यांच काय? त्यासाठी काय प्रक्रिया आहे. याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »