rain update today-सकाळपासून संततधार पण नदीनाले,तलाव तहानलेलेच
लोकगर्जनान्यूज
बीड : जिल्ह्यात बहुतांश भागात आज सकाळपासून संततधार पाऊस ( rain update today ) सुरू आहे. यामुळे काही अंशी शेतकरी सुखावला असलातरी जवळपास सर्वच तलाव व काही अपवाद वगळता नदीनाले तहानलेलेच असल्याने मोठ्या पावसाची प्रतिक्षा आहे.
जुलै महिना संपत आलेला आहे तरीही बीड जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला नाही. अनेकवेळा मुसळधार,एलो अलर्ट, ऑरेंज अलर्ट दिला पण टिप टिप पाऊस झाला आहे. तोही सर्व समावेशक नाही. यामुळे पिके जिवंत आहेत पण पाणी नाही. अशी परिस्थिती जिल्ह्याची आहे. पण आज गुरुवार ( दि. २७ ) सकाळपासून बीडसह केज, धारुर,वडवणी, अंबाजोगाई, परळी जवळपास जिल्ह्यातील बहुतांश भागात संततधार पाऊस ( rain update today ) सुरू आहे. थोडासा जोर असल्याने शेतकरी सुखावला आहे. परंतु अद्याप जोरदार पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील सर्व धरण, तलाव, नदीनाले तहानलेलेच आहेत. काही ठिकाणी थोडंफार नदीला पाणी आलं आहे. नद्या कोरड्या असल्याने जमिनीची पाणीपातळीत वाढ झाली नाही. यामुळे शेतकऱ्यांच्या विहिरी, बोअरलाही पाणी वाढलं नाही.
मराठवाड्यातील या पाच जिल्ह्यांतील २९५ महसूल मंडळात पावसाची हजेरी
सर्वत्र पाऊस धो धो बरसत असताना मराठवाडा मात्र कोरडा होता. परंतु आज बीड, लातूर, उस्मानाबाद, जालना, औरंगाबाद जिल्ह्यातील २९५ महसूल मंडळात मध्यम, हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. यामध्ये बीड जिल्ह्यातील ६३, लातूर, ६०, उस्मानाबाद ४२, जालना ४७, औरंगाबाद ८३ असे महसूल मंडळ आहेत.