Rain Update Beed – बीड जिल्ह्यात गारपीट अन् अवकाळी पाऊस
पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांनो ( Crop Insurance ) तक्रार करा
लोकगर्जनान्यूज
बीड : जिल्ह्यातील अनेक भागात दोन दिवसांपासून गारपीट व अवकाळी पाऊस सुरू आहे. यामुळे रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे पुन्हा शेतकरी संकटात सापडला आहे. रब्बी पिकांचा विमा ज्या शेतकऱ्यांनी काढला आहे. त्या शेतकऱ्यांनी क्रॉप इन्शुरन्स ( Crop Insurance ) ॲपवरून नुकसानीची तक्रार करावी.
शुक्रवार व शनिवार ( दि. १७,१८ ) असे सलग दोन दिवसांपासून बीड जिल्ह्यातील धारुर,केज,वडवणी, परळी, अंबाजोगाई, माजलगाव सह आदि भागात अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. गारपीट मोठ्या प्रमाणात झाली आहे. गारपीट व पावसामुळे शेतातील गहू, हरभरा, ज्वारी, बाजरी, आंबे, टरबूज, खरबूज आदी फळ, पिके व भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. खरीप हंगामात परतीच्या पावसामुळे संकटात सापडलेला शेतकरी त्यातून बाहेर पडलेला नाही. तोच पुन्हा अवकाळी पाऊस आणि गारपीटीने हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला. शासनही मदतीच्या वांझोट्या घोषणा करत असून, अद्याप पर्यंत खरीप हंगामातील नुकसान भरपाई मिळालेली नाही. यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून शासनाने गांभीर्याने विचार करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जाहीर नाही तर खात्यावर टाकण्यात आल्याची घोषणा करावी
Crop Insurance-पिकांचा विमा काढलेल्या शेतकऱ्यांनी तक्रार करावी
ज्या शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिकांचा विमा भरला आहे. त्यांनी तातडीने ७२ तासांच्या आत Crop Insurance ॲपवरून ऑनलाईन तक्रार करावी. यामुळे अवकाळी पाऊस व गारपीटीने नुकसान झालेल्या पिकांची विमा कंपनीकडून भरपाई मिळेल.