काकाजी समर्थक घेणारे नाही देणारेच; एका आवाहनावर संकटातील बळीराजा साठी ३२ लाखांची मदत जमा

लोकगर्जनान्यूज
बीड : केज विधानसभा मतदारसंघाचे आधारवड वर्षाचे १२ महिने ३६५ दिवस व दिवसाचे २४ तास ज्यांनी जनतेसाठी स्वतः ला वाहून घेतले आहे असे नंदकिशोर मुंदडा (काकाजी) यांनी माझा बळीराजा संकटात असताना मी वाढदिवस कसा साजरा करु, मला भेटण्यासाठी येताना फुले, हारतुरे, शॉल काहीच आणू नये आणि मी ते स्वीकारणार ही नाही. जर काही द्यायचेच असेल तर संकटातील बळीराजाला मदत करा ती मदत आपण मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करु असे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांनी मदत केली. एका दिवसाचा ३१ लाख ८४ हजार ८४० रुपये इतकी मदत जमा झाली. ही पूर्ण रक्कम आता अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्यात येणार आहे. यामुळे जो जनतेसाठी स्वतः ला वाहून घेतो तो प्रत्येक वेळी जनतेच्या हिताचा सेवेची संधी शोधत असतो यासाठी उत्तम उदाहरण म्हणजे नंदकिशोर मुंदडा असून , त्यांचे समर्थक ही घेणारे नसून देणारेच असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
केज मतदारसंघातील जेष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंदडा (काकाजी) यांचा वाढदिवस विजयादशमी दिवशी उत्साहात व समाज उपयोगी उपक्रम राबवून साजरा करण्यात येतो. या दिवशी केज विधानसभा मतदारसंघासह जिल्हाभरातून त्यांचे लहान, थोर, तरुण समर्थक काकाजींना शुभेच्छा देण्यासाठी दिवसभर रीघ लावतात. परंतु यावर्षी मराठवाड्यासह बीड जिल्ह्यात अतिवृष्टी झाली यामुळे नदी, नाल्यांना महापूर आला या पुराने आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पीकच नव्हे तर जमीन ही खरडून घेऊन गेला. यामुळे कधी नव्हे तो बळीराजा मोठ्या संकटात सापडला असून अनेक शेतकऱ्यांच्या तर जमिनीसह गुरेढोरे ही या पावसाने हिरावून घेतली आहेत. एवढ्या मोठ्या संकटात माझा बळीराजा असताना मी वाढदिवस कसा साजरा करु? असा प्रश्न तोच माणूस विचारु शकतो ज्याला शेतकरी, मजूर यांच्या संकटाची जाणीव आहे. बळीराजा संकटात असल्याने मी वाढदिवस साजरा करणार नाही. हारतुरे, शाल , श्रीफळ स्वीकारणार नाही, जर तुम्हाला काही द्याचेच असेल तर बळीराजा साठी मदत द्या त्याच माझ्यासाठी सर्वात मोठ्या शुभेच्छा आहेत. ही मदत संकटातील बळीराजा साठी आपण मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करु असे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत काकाजींना शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या त्यांच्या समर्थकांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदत केली. आज त्याची मोजणी करण्यात आली तर त्या मदत पेटीतून तब्बल ३१ लाख ८४ हजार ८४० रुपये इतकी रक्कम निघाल्याने काकाजी यांनी समाधान व्यक्त केले. या मदतीने जसा नेता तसेच समर्थक ज्यांना फक्त लोकांना देणे माहिती आहे घेणे नाही. यावर शिक्कामोर्तब झाले. या मदतीच्या माध्यमातून काकाजी यांनी घेतलेल्या जनसेवेचा वसा आणि त्यातून जोडले गेलेले कौटुंबिक नाते यावर शिक्कामोर्तब झाले आहे. अशा काळात इतकी मोठी मदत जमा होणे अशक्य बाब असून हे फक्त काकाजीच करु शकतात अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
