PMY-प्रधानमंत्री किसान सन्मान निधी मिळत नसेल तर शेतकऱ्यांसाठी म्हत्वाची बातमी
लोकगर्जनान्यूज
केज : केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी दरवर्षी 6000 प्रमाणे सन्मान निधी देण्यात येत आहे. परंतु अनेक शेतकऱ्यांना काही त्रुटींमुळे हा निधी मिळत नाही. अशा सर्व शेतकऱ्यांसाठी केज तहसीलदार यांनी तहसील कार्यालयात दोन दिवसांचे शिबिर आयोजित केले. केज तालुक्यातील निधी खात्यावर येत नसेल तर मंगळवार व बुधवार असे दोन दिवस सकाळी 10 ते दुपारी 1 च्या आत तहसील कार्यालयात उपस्थित रहावे असे आवाहन तहसीलदार केज यांनी केले आहे.
केंद्र सरकार प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेच्या ( PMY ) माध्यमातून शेतकऱ्यांना प्रतिवर्षी 6 हजार असा सन्मान निधी दिला जात आहे. हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहे. परंतु अद्यापही अनेक शेतकऱ्यांना हा सन्मान निधी मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. अनेक शेतकरी दररोज तहसील कार्यालयात यासाठी चकरा मारत असूनही त्यांना सन्मान निधी मिळत नाही. या शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचं निधी मिळावा यासाठी केज तहसीलदार यांनी दोन दिवस मंगळवार ( दि. 29 ), बुधवार ( दि. 30 ) शिबीर आयोजित करण्यात आले. यावेळी काही चुका असतील अथवा का? पगार मिळत नाही. ते समस्या सोडविण्यात येणार आहेत. याची वेळ सकाळी 10 ते दुपारी 1 अशी आहे.
आवश्यक कागदपत्रे
1. तक्रारी अर्ज
2. आधार कार्ड (पती व पत्नी )
3. बँक पासबुक
4. सात बारा प्रत