कृषी

Onion Subsidy- कांदा अनुदानासाठी कुठं अर्ज करायचा, कागदपत्रे काय लागणार?

लोकगर्जनान्यूज

बीड : भाव नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. या शेतकऱ्यांना आधार मिळावा म्हणून राज्य शासनाने प्रतिक्विंटल 350 रु. अनुदान घोषित केला.कांदा अनुदान ( Onion Subsidy ) मिळविण्यासाठी अर्ज कुठं करावं लागणार ( तारीख काय?,अर्जासोबत कोणती कागदपत्रे जोडायची? या सर्वे प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी ही बातमी पुर्ण वाचा.

शेतकऱ्याने कबाड कष्ट करून पीक काढले पण भाव काही मिळत नाही. कापूस, सोयाबीन भाव वाढीच्या प्रतीक्षेत घरात पडून आहे. कांदा निघाला तर भाव पडले. काही शेतकऱ्यांना तर कांदा काढून, विक्री केल्यानंतर खिशातून पैसे द्यावे लागले. काही शेतकऱ्यांच्या हातावर 1,2, रू. पडल्याचे बातम्या छापून आलेल्या आहेत. हा प्रकार पहाता काही शेतकऱ्यांनी तर कांदा फुकट वाटला, कोणी रस्त्यावर फेकून दिला. अशा तऱ्हेने कांदा नगदी पीक हातचे गेल्यानं शेतकरी संकटात सापडला. आधार देण्यासाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत घोषित करण्याची मागणी सुरू झाली, शेतकऱ्यांमध्ये वाढता असंतोष पहाता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा अनुदान योजना 2023 अंतर्गत प्रतिक्विंटल 350 मदत ( Onion Subsidy ) घोषित केली. प्रति शेतकरी 200 क्विंटल मर्यादित हे अनुदान मिळणार आहे. यासाठी शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. आपण ज्या कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा विक्री केला आहे. त्याठिकाणी कांदा अनुदान योजना 2023 विहीत नमुन्यातील अर्ज भरुन द्यावयाचा आहे. सदरील अर्ज उद्या सोमवार ( दि. 3 ते 20 ) एप्रिल सुट्टीचे दिवस ओघळू स्वीकारले जाणार आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अर्ज करावेत. 1 फेब्रुवारी ते 31 मार्च याच कालावधीतील शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे.
हे कागदपत्रे अर्जासोबत जोडावी लागणार
कांदा विक्रीची मुळ पट्टी
कांदा पिकाची नोंद घेतलेला 7/12 उतारा
बॅंक पासबुक झेरॉक्स
आधार कार्ड झेरॉक्स
ज्या प्रकारात कांदा विक्री पट्टी दुसऱ्याच नावाची अन् 7/12 कुटुंबातील इतर व्यक्तीच्या नावे असेल तर अशा शेतकऱ्यांना सहमती शपथपत्र जोडावे लागेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »