night bike accident- दुचाकी अपघातात तरुण ठार
आईला सोडून घराकडे परतताना काळाने केली आई-मुलाची ताटातूट
लोकगर्जनान्यूज
बीड : धार्मिक कार्यक्रमासाठी आईला सोडून दुचाकीवर परत घरी येताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने घडलेल्या अपघातात ( night bike accident ) तरुण जागीच ठार झाला. सदर घटना गुरुवारी रात्री टाकळी अमिया रस्त्यावर घडली आहे. त्याला काय माहित काळ त्याची वाट पहात असून तो आईला कधीच भेटणार नाही. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.
वैभव ( महेश ) नागेश होळकर ( वर १८ वर्ष ) हा तरुण टाकळी अमिया येथे संत बाळु मामाच्या मेंढ्या आलेल्या असल्याने येथील धार्मिक कार्यक्रमासाठी दुचाकी क्रमांक एम.एच. १४ एफ यू ५१०१ वैभव आईला घेऊन गेला. आईला तेथे सोडून दुचाकीवर परत घराकडे येताना गुरुवारी ( दि. ४ ) रात्री ९:३० च्या सुमारास रस्त्यात अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. यामुळे घडलेल्या अपघातात ( night bike accident ) वैभव होळकर जागीच ठार झाला. अन् या घटनेने कायमची आई-मुलाची ताटातूट केली. अवघ्या १८ वर्षांचा तरुण गेल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.