night bike accident-आडस-अंबाजोगाई रस्त्यावर पुन्हा अपघात: दुचाकीस्वार गंभीर जखमी
लोकगर्जनान्यूज
आडस : दुचाकीचा अपघात ( night bike accident ) होऊन दुचाकी स्वार गंभीर जखमी झाल्याची घटना आज सायंकाळी 8 वाजण्याच्या सुमारास आडस-अंबाजोगाई रस्त्यावर उमराई जवळ घडली आहे. प्रवाशांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अपघात ग्रस्ताला रुग्णवाहिका ( ambulance ) बोलावून दवाखान्यात पाठविले असून अंबाजोगाई येथे स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शनिवारीच स्कॉर्पिओ पलटी होऊन एकाचा याच रस्त्यावर बळी गेल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी ( दि. 3 ) रात्री 8 वाजण्याच्या सुमारास दुचाकीचा अपघात ( night bike accident ) झाला आहे. यामध्ये सुभाष उत्तम लाड रा. लाडेवडगाव ( ता. केज ) हे गंभीर जखमी झाले आहेत. सदरील अपघात आडस-अंबाजोगाई रस्त्यावर उमराई जवळ पाईप लाईन साठी खड्डा खांदण्यात आलेल्या ठिकाणी झाला. यामुळे त्यांना अंधार खड्डा दिसला नाही की, खड्डा चुकवताना एखाद्या वाहानाने धडक दिली याबाबत अधिकृत काहीच माहिती समोर आली नाही. परंतु दुचाकी पडलेली व बाजुला एका व्यक्तीला पाहून काही प्रवासी थांबले व त्यांनी रुग्णवाहिका ( ambulance ) बोलावून तातडीने दवाखान्यात पाठविले आहे. सध्या अंबाजोगाई येथे स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर नातेवाईकांना अपघाताची माहिती दिल्याने त्यांनीही रुग्णालयाकडे धाव घेतली आहे.