आपला जिल्हा

msrtc bus timetable धारुर आगारचे वेळापत्रक कोलमडले

बस न आल्याने दोन तास विद्यार्थी, प्रवासी ताटकळले

लोकगर्जनान्यूज

केज तालुक्यातील आडस येथे तब्बल दोन तास बस न आल्याने शाळेतील विद्यार्थी व प्रवासी ताटकळल्याचे चित्र बुधवारी ( दि. २६ ) दिसून आले. हे नियमित झाले असून धारुर आगारला वेळापत्रकच नाही ( msrtc bus timetable ). का, तो कोलमडून पडलय असा प्रश्न विचारला जात आहे.

आडस, अंबाजोगाई रस्त्यावर एकमेव धारुर आगारच्या राज्य परिवहन महामंडळाच्या बस धावतात. या आगाराला सर्वाधिक उत्पन्न देणारा हा मार्ग आहे. परंतु आगार प्रमुखांच्या नियोजन शुन्य कारभारामुळे या मार्गावर कधीच वेळेवर बस सोडली जात नाही. येथे प्रवाशांना रस्त्यावर उभे राहून दोन-दोन तास बसची प्रतीक्षा करावी लागते. आल्यातर एकदाच दोन-तीन बस येतात. यामुळे यांना वेळापत्रक नाही की, तो कोलमडून पडला आहे. असा प्रश्न प्रवासी विचारत आहेत. बुधवारी ( दि. २६ ) दुपारी ३:३० वाजल्यापासून अंबाजोगाई कडून धारुरला जाण्यासाठी बस नव्हती यामुळे शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थीनी, प्रवासी ५:३० पर्यंत तब्बल दोन तास बसची प्रतीक्षा करुन ताटकळले होते. तरीही बस काही आलेली नव्हती. दोन दिवसांपुर्वीच बस नसल्याने विद्यार्थ्यांनी धारुर बसस्थानकात शाळा भरवल्याची घटना घडली असून तसे काही वर्तमानपत्रांतून बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. परंतु तरीही याची धारुर आगाराने दखल घेतलेली दिसत नाही. यामुळे आगाराच्या कारभाराला कंटाळून गेलेले प्रवासी संताप व्यक्त करत असून धारुर आगारचा कारभार नेमका कधी सुधारणार असा प्रश्न विचारत आहेत.
आधीच बसण्यासाठी जागा नाही त्यात बस उशिरा

आडस येथे बसस्थानक नसल्याने प्रवाशांना बसण्याची कसल्याही प्रकारची व्यवस्था नाही. सर्व प्रवाशांना रस्त्यावर, हॉटेल,टपरी समोर उभं राहून बसची प्रतीक्षा करावी लगते. त्यात कधीच बस वेळेवर येत नसल्याने प्रवाशांना दोन-दोन तास ताटकळत उभे रहावे लागते. याचा सर्वाधिक त्रास महिला व मुलींना होत आहे. याकडेही राज्य परिवहन महामंडळ व लोकप्रतिनिधी यांनी लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »