MPSC – या दोन लेकींनी बीड जिल्ह्याची मान उंचावली
एक राज्यात पहिली तर दुसरीने घरीच अभ्यास करून केले यश संपादन
लोकगर्जनान्यूज
बीड : ऊसतोड मजुरांचा जिल्हा आता MPSC च्या माध्यमातून अधिकाऱ्यांचा जिल्हा ठरत आहे. संतोष खाडे, सोनाली मात्रे यांच्या नंतर शेख सीमा आणि सय्यद हुनैन या दोन लेकींनी अधिकारी होऊन जिल्ह्याची मान उंचावली आहे. सीमा यातर मुलींमध्ये प्रथम आल्या असून, सय्यद हुनैन यांनी घरीच अभ्यास करत अधिकारी होण्याचे स्वप्न साकार केले. या यशाबद्दल दोन्ही लेकींवर सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.
मराठवाडा अन् त्यातील बीड म्हटलं की, ऊसतोड मजुरांचा ऊसतोडणीसाठी बालविवाह करणारा, स्त्री भ्रूणहत्येचा मुंडे हॉस्पिटलमुळे लागलेला काळ डाग असणारा जिल्हा म्हटलं जातं तसंच विकासात सर्वात मागे अन् राजकारणात सर्वात पुढे म्हणूनही बीडला ओळखलं जातं. पण आता MPSC टॉपरांचा जिल्हा म्हणूनही बीड पुढे येत आहे. हे काम प्रथम सोनाली मात्रे ही राज्यात मुलीतून पहिली आली. या पाठोपाठ संतोष खाडे हा ओबीसी मधून पहिला आला तर मार्च अखेरीस वनपरिक्षेत्र अधिकारी वर्ग १ चे निकाल आले त्यात गेवराई तालुक्यातील शेख सीमा अजिज ( रा. मादळमोही ) ही राज्यात मुलीतून पहिली आली. हे यश जिल्ह्यासाठी अभिमानास्पद असून परत शेख सीमा यांनी यशाची गगनभरारी घेऊन बीड जिल्ह्याची मान उंचावत वनपरिक्षेत्र अधिकारी वर्ग १ पदी विराजमान होऊन स्वप्न साकार केले. तसेच बीड जिल्ह्याची दुसरी लेक सय्यद हुनैन बतुल कलीम अहेमद हीने ही केवळ जिद्द व चिकाटीच्या जोरावर कोणतेही क्लास न लावता तसेच बाहेर कुठेही न रहाता घरीच अभ्यास करुन
MPSC सर करत आयबीपीएस ॲग्रीकल्चर स्पेशालिस्ट ऑफिसर स्केल – १ ( कृषी अधिकारी वर्ग -१ ) पदी निवड झाली. घरी अभ्यास करुन स्पर्धा परीक्षा सर करण ही सोपी गोष्ट नाही. त्यामुळे या दोन्ही लेकीचे सर्वस्तरातून कौतुक करण्यात येत आहे.
मामा कडून प्रेरणा घेतली – शेख सीमा
शेख सीमा अजिज यांचे वडील डॉक्टर असून, घरात शैक्षणिक वातावरण चांगले आहे. सीमा या अभ्यासात हुशार त्या शाळेत असताना त्यांचे मामा MPSC स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते. त्यांची पुस्तकं या वाचायच्या, हे पाहून मामांनी पेपर वाचनाची सवय लावली, MPSC तुझ्यासाठी ही परीक्षा असून, तयारी कर म्हणून मला प्रेरणा दिली. पुणे येथे राहुन अभ्यास केला. मी यशस्वी होणार ही खात्री होतीच परंतु मुलींमध्ये राज्यात प्रथम आले. ही बाब माझ्यासाठी खुप अभिमानाची असल्याचे मत शेख सीमा यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले आहे.
सय्यद हुनैन यांच्या यशातून अशक्य काहीच नाही याची शिकवण
सय्यद हुनैन यांचे वडील कलीम अहेमद हे सेवानिवृत्त तहसीलदार आहेत. हुनैन यांनी बीड येथील कृषी व अन्न तंत्र महाविद्यालयातून बीएससी ॲग्री ( BSC Agree ) पदवी प्राप्त केली. परंतु त्यांचे अधिकारी होण्याचे स्वप्न होते. मग तयारी सुरू करत बीड येथेच घरी राहून MPSC चा अभ्यास सुरू केला. निकाल हाती पडल्यानंतर आनंद गगनात मावेनासा झाला. सय्यद हुनैन यांनी MPSC परीक्षा सर करत त्यांची कृषी अधिकारी वर्ग -१ साठी पात्र ठरल्या. यामुळे MPSC साठी मोठे क्लासेस लावणं, मोठ्या शहरात रहाणे गरजेचे नाही. त्यासाठी फक्त अभ्यासाची तयारी, चिकाटी पाहिजे यश तुमच्याकडे धावत येतो.