mpsc मध्ये यशस्वी ठरलेल्या भूमिपुत्रांच्या पाठीवर उद्या अमरसिंह पंडित यांच्या कडून शाब्बासकीची थाप
गेवराईत शारदा प्रतिष्ठानकडून गौरव सोहळ्याचे आयोजन
गेवराई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या mpsc स्पर्धा परिक्षेत याहीवर्षी तालुक्यातील तरुणांना मोठे यश प्राप्त झाले. यामुळे ‘अधिकाऱ्यांचा तालुका’ म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी धडपडणारे अमरसिंह पंडित यांनी शारदा प्रतिष्ठानच्या माध्यमातून भुमिपूत्रांच्या गौरव सोहळ्याचे आयोजन शनिवारी ( दि.१५ ) सकाळी १०३०ः वा. र.भ.अट्टल महाविद्यालय, गेवराई येथे केले आहे. स्पर्धा परिक्षेत यशस्वी झालेल्या सर्व अधिकाऱ्यांचा भव्य सत्कार या कार्यक्रमात होणार आहे. याप्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहन शारदा प्रतिष्ठानकडून करण्यात आले आहे.
अधिकाऱ्यांचा तालुका म्हणून गेवराईची ओळख व्हावी यासाठी माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी र.भ.अट्टल महाविद्यालय येथे अद्यावत मोफत स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्र सुरु केले. युवकांना प्रेरणा मिळावी यासाठी स्पर्धा परिक्षेत यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा शारदा प्रतिष्ठानच्या माध्यमातून ते गौरव करत असतात, यावर्षी गेवराई तालुक्यातील अनेक विद्यार्थ्यांनी पोलिस उपनिरीक्षक, सहाय्यक अभियंता, विक्रीकर निरीक्षक, तांत्रिक अधिकारी यांसारख्या पदावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत mpsc घेण्यात आलेल्या परिक्षेत यश संपादन केले. या यशस्वी गुणवान उमेदवारांचा भव्य सत्कार शारदा प्रतिष्ठान आणि र.भ.अट्टल महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने गोदावरी सभागृह, र.भ.अट्टल महाविद्यालय, येथे होणार आहे. याप्रसंगी बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित, जय भवानीचे व्हाईस चेअरमन भाऊसाहेब नाटकर, बाजार समितीचे सभापती मुजीब पठाण, उपसभापती विकास सानप, भवानी अर्बन बँकेचे अध्यक्ष बप्पासाहेब मोटे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष संग्राम आहेर, उपाध्यक्ष फुलचंद बोरकर यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. गौरव समारंभास उपस्थित राहण्याचे आवाहन शारदा प्रतिष्ठानकडून करण्यात आले आहे.
या भूमिपुत्रांचा होणार सत्कार
कृष्णा ढाकणे (पोलिस उपनिरीक्षक), बदाम सिरसाट (पोलिस उपनिरीक्षक), कृष्णा बहिर (पोलिस उपनिरीक्षक), सुरज आहेर (पोलिस उपनिरीक्षक), लक्ष्मण माने (पोलिस उपनिरीक्षक), शुभम कोरडे (पोलिस उपनिरीक्षक), कृष्णा शिंदे (सहा.अभियंता), अजिज शेख (विक्रीकर निरीक्षक), सिमा अजिज शेख (वन अधिकारी), संजय येवले (तांत्रिक अधिकारी) यांचा शारदा प्रतिष्ठानचे कार्यवाह तथा जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अमरसिंह पंडित यांच्या शुभहस्ते गौरव होणार आहे.