Mpsc-च्या माध्यमातून केज तालुक्यातील ‘या’गावाची लेक थेट मंत्रालयात
मुल व घर सांभाळून केली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा सर
लोकगर्जनान्यूज
केज : तालुक्यातील सारणी ( आ. ) शाळेतच शिक्षण घेतले, डी.एड. केलं पण यानंतर लग्नही झाले. पण काहीतरी करण्याची जिद्द असल्याने पुनम महादेव सोनवणे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग ( Mpsc ) ची तयारी सुरू केली. घर,मुल सांभाळत ती सर करत मंत्रालयीन स्तरावरील महसूल सहाय्यक पदावर यशस्वी झेप घेतली.
पुनम महादेव सोनवणे ही सारणी ( आ. ) लेक घरची परिस्थिती जेमतेम. इयत्ता १२ पर्यंतचे शिक्षण गावातच पुरुषोत्तमदादा सोनवणे माध्यमिक विद्यालय येथे झाले. शिक्षणात हुशार असल्यामुळे १२ ला चांगले मार्क मिळाले. शिक्षक होण्याचे स्वप्न मनाशी बांधून डी.एड. केलं पण मागील अनेक वर्षांपासून शासनाने शिक्षकांच्या जागा न भरल्याने १२ नंतर डी.एड. पण डी.एड. नंतर काय? हा प्रश्न निर्माण झाला. हजारो डी.एड. ची मुलं,मुली सुशिक्षित बेकार म्हणून पडून आहे. पण मेहनत करण्याची तयारी, काहीतरी करुन दाखवायची जिद्द असेल ना तर माणसासाठी काही ही अशक्य नाही. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे केज तालुक्यातील सारणी ( आ. ) येथील पुनम या आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. सारणी ( आ. ) एक छोटंसं गाव १२ व डी.एड. झाल की, पुनम यांचं लग्न झालं. डी.एड. धारकांची अवस्था पाहून त्यांनी आपलं स्वप्न साकार होणार नाही. हे ओळखून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या Mpsc स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. चिकाटी व जिद्दीने अभ्यास करत तीन दिवसांपूर्वी लागलेल्या निकालात पुनम या यशस्वी ठरल्या आहेत. त्या आता मंत्रालयात महसूल सहाय्यक या पदावर विराजमान होतील. या यशाबद्दल पुनम सोनवणे यांचे राहुल सोनवणे, सरपंच सौ. प्रविणा संतोष सोनवणे, प्राचार्य पी.एच. लोमटे यांच्यासह आदींनी केले आहे.