MPSC च्या निकालात केज तालुक्यातील ‘या’ गावाचा बोलबाला; चौघांची निवड
लोकगर्जनान्यूज
केज : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) परीक्षेचा दि.३० सप्टेंबर रोजी निकाल लागला आहे. यामध्ये केज तालुक्यातील कुंबेफळ येथील एकाच गावातील चौघांची महसूल सहाय्यक पदासाठी निवड झाली आहे. या निवडीमुळे कुटुंब आणि गावकऱ्यांमध्ये आनंदाचा पारावार उरला नाही.
गतवर्षी झालेल्या (MPSC)परीक्षेचा निकाल दि. ३० सप्टेंबर रोजी जाहीर झाला असून यामध्ये कुंबेफळ (ता.केज ) येथील विजय दगडू पारवे – महसूल सहाय्यक, अभिजित विष्णु थोरात महसूल सहाय्यक, प्रांजली नवनाथ जाडकर- महसूल सहाय्यक, महेंद्र बन्सी निंगुळे महसूल सहाय्यक या चौघांची निवड झाली आहे. एकाचवेळी चार जणांची शासकीय सेवेसाठी निवड झाल्याने त्यांचे कुटुंबीय व गावकरी यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही.
MPSC मधून शासन सेवेत निवड झाल्याने या चौघांवर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या सर्वांचे ग्रामपंचायत कार्यालय व गावकऱ्यांनी अभिनंदन केले असून व पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा दिल्या आहेत.
कुंबेफळ गावची यशस्वी परंपरा तरुण पिढी ही पुढे नेत असल्याने गावचा नावलौकीकही वाढतच आहे. ही अभिमानास्पद बाब असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.