Mpsc-केज तालुक्याचा पुत्र उपशिक्षणाधिकारी पदी
लोकगर्जनान्यूज
केज : तालुक्यातील आडस येथील गणेश आकुसकर यांनी सेवा अंतर्गत उपशिक्षणाधिकारी पदासाठी परीक्षा दिली. महाराष्ट्र लोकसेवा आयोग ( mpsc ) नुकताच निकाल लागला असून यामध्ये त्यांनी यश संपादन केले असून आता शिक्षक असलेले गणेश आकुसकर उपशिक्षणाधिकारी होणार असल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.
आडस ( ता. केज ) चे भूमिपुत्र गणेश कांताराव आकुसकर हे सध्या जिल्हा परिषद माध्यमिक शाळा धारुर येथे मुख्याध्यापक म्हणून आपलं कर्तव्य बजावत आहेत. गणेश आकुसकर यांनी उपशिक्षणाधिकारी पदासाठी सेवा अंतर्गत मर्यादित विभागीय परीक्षा तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग ( mpsc ) ची परीक्षा दिली. याचा नुकताच निकाल लागला असून गणेश आकुसकर यांनी या परीक्षेत यश संपादन केले. ते मुख्याध्यापक पदावरून थेट उपशिक्षणाधिकारी होणार आहेत. ही बातमी कळताच आडस व परिसरातून मित्र, नातेवाईक, शिक्षक सह आदि कडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.