MPSC-केजचा विशाल मुळे बनला शिक्षणाधिकारी
दोन वेळा अपयश परंतु मेहनत न सोडता तिसऱ्या प्रत्नात यश संपादन
लोकगर्जनान्यूज
केज : जिल्हा परिषद शाळेवर आई – वडील शिक्षक असताना त्यात वडिलांचे मागच्या काही महिन्यांपूर्वी निधन झाले. वडिलांनी मुलाला अधिकारी बनविण्याचे पाहिलेले स्वप्न मुलाने एमपीएससीला गवसणी घालून पूर्ण केले. लाडेगाव (ता. केज) विशाल पांडुरंग मुळे यांची शिक्षणाधिकारी या वर्ग – १ पदावर निवड झाली असून शिक्षकाचा मुलगा शिक्षणाधिकारी झाला आहे.
लाडेगाव (ता. केज) येथील विशाल पांडुरंग मुळे यांचे वडील पांडुरंग मुळे व आई शोभा मुळे हे दोघे जिल्हा परिषदेचे शिक्षक. विशाल याने पिसेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक तर नेवासा येथे सैनिक स्कुलमध्ये माध्यमिकचे पूर्ण केले. त्यांनतर पुणे विद्यापीठातून बी. ई. मेकॅनिकल ही अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली. विशालला अभियंता होण्याऐवजी प्रशासकीय सेवेत अधिकारी होयचे होते. तर वडिलांचे ही विशाल याने अधिकारी बनावे स्वप्न होते. त्यामुळे त्यांनी विशालला प्रोत्साहन दिल्याने तो स्पर्धा परिक्षेकडे वळला. त्याने नियमितपणे अभ्यास करीत त्याने जानेवारी २०२३ मध्ये राज्य लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा दिली होती. या परीक्षेचा निकाल लागण्यापूर्वी विशालच्या वडिलांचे ७ जुलै २०२३ रोजी ह्रदयविकाराने निधन झाले. या दिलेल्या राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा १८ जानेवारी निकाल लागला. त्यात विशाल याने खुल्या वर्गातून ४६ वी रँक मिळवून यश संपादन केले होते. तर २० मार्च रोजी निवड यादी लागली असून त्यात विशाल मुळे यांची शिक्षणाधिकारी पदावर निवड झाली आहे. शिक्षकाचा मुलगा शिक्षणाधिकारी बनला असून त्याने आई – वडिलांचे अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले. त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
आई – वडिलांनी शिक्षणासाठी कुठलीही कमतरता भासू दिली नाही. अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दोनदा थोडक्या गुणांनी संधी हुकली. तरी त्यांनी पुन्हा प्रोत्साहन दिल्याने मी अभ्यासाच्या जोरावर यश संपादन केले. आज वडिल असते तर त्यांना मुलगा शिक्षणाधिकारी झाल्याचा खूप आनंद झाला असता.