mpsc – एमपीएससी परीक्षेत बीडची चलती;प्रशांत सानप राज्यात सातवा
सार्वजनिक बांधकाम विभागात इलेक्ट्रिक इंजिनिअर ( electric engineer ) पदी निवड!

लोकगर्जनान्यूज
बीड : महाराष्ट्र लोकसेवा आयोग ( mpsc ) मार्फत सार्वजनिक बांधकाम विभागात इलेक्ट्रिक इंजिनिअर ( electric engineer ) पदासाठी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत शिरुर कासार तालुक्यातील तरुणाने घवघवीत यश संपादन करत राज्यातून 7 येण्याचा मान पटकावला आहे. या यशाबद्दल त्याचे कौतुक करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील अनेक तरुणांनी मेहनतीच्या जोरावर महाराष्ट्र लोकसेवा आयोग ( mpsc ) स्पर्धा परीक्षेत यश संपादन करत गुणवत्ता यादीत मुलीतून प्रथम, प्रवर्गातून दुसरा, सातवा येऊन बीड जिल्ह्याची मान उंचावली आहे. आजही अशीच आनंदाची बातमी मिळाली असून, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ( mpsc ) सार्वजनिक बांधकाम विभागात इलेक्ट्रिक इंजिनिअर ( electric engineer ) वर्ग दोन राजपत्रित अधिकारी 50 पदासाठी परीक्षा घेण्यात आली. या परिक्षेसाठी राज्यातून प्रिलिमसाठी एकूण दोन लाख विद्यार्थी बसले होते. मेन परिक्षेसाठी 600 यातून केवळ 150 विद्यार्थ्यांची यादी लागली आहे. याच परीक्षेसाठी प्रशांत अंकुश सानप रा. आर्वी ( ता. शिरुर कासार ) हा तरुण बसला होता. यामध्ये प्रशांत यांनी 450 पैकी 321 गुण घेऊन राज्यातून सर्वसाधारण यादीत सातवा नंबर पटकावला आहे. या परीक्षेचा निकाल ( दि. 25 ) एप्रिल रोजी लागला आहे. निकाल हाती येताच कुटुंबाचे आनंद गगनात मावेनासे झाले असून प्रशांत यांचे मित्र, नातेवाईक व गावकऱ्यांकडून कौतुक करण्यात येत आहे.