monsoon- यंदाचा मान्सून पहिला अंदाज; पाऊस कसा असणार?
लोकगर्जनान्यूज
बीड : 2023 या वर्षी मान्सून ( monsoon ) कसा असणार आहे. याबाबत हवामान विभागाने पत्रकार परिषद घेऊन पहिला अंदाज वर्तवला आहे. यावेळी त्यांनी यंदाही सरासरी 96 टक्के पाऊस होईल असे म्हटले आहे. यामुळे समाधान व्यक्त केले जात असून, हे सलग पाचव वर्ष असून सरासरी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला. दुसरा अंदाज मे महिन्याच्या अखेरीस जाहीर करण्यात येईल असे म्हटले आहे.
भारत हा कृषिप्रधान देश असून, यामुळे शेतकरी मान्सून ( monsoon ) वर लक्ष ठेवून असतात. त्यामुळे एप्रिल महिना सुरू झाला की, शेतकऱ्यांना मान्सून व खरीपाचे वेध लागतात. शेताची नांगरणी, मोगडा आदि मशागतीची कामे शेतकरी सुरु करतो. हवामान विभागानेही पत्रकार परिषद घेऊन मान्सून बाबतीत गोड बातमी दिली. यावेळी हवामान विभाग सचिव डॉ. एम.महोपात्रा, पृथ्वी विज्ञान मंत्रालय सचिव डी.एम. रविचंद्रन उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले की, हिंदी महासागराची मान्सून साठी स्थिती अनुकूल आहे. यामुळे यंदा पाऊस हा सरासरी राहील. 96 टक्के पाऊस होईल, यात कमी जास्त झाले तरी 5 टक्याचा फरक पडेल. कमी झाले तरी 5 टक्के व जास्त झाले तरी 5 टक्के असेल. अलनिनो वर्षाचा प्रत्येक मान्सूनवर परिणाम होत नाही. सलग 5 व्या वर्षीही सरासरी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. फक्त यंदा काही संकट येऊ नये अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.