mansun update-मान्सून बाबतीत हवामान विभागाची दिलासादायक माहिती; काय झाला बदल?
लोकगर्जनान्यूज
महाराष्ट्रासह देशभरात यंदा मान्सून खोळंबला आहे. याला कारणीभूत बिपरजॉय हे वादळ असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे शेतकरी, व्यापारी सर्व नागरिकांना पावसाची प्रतिक्षा आहे. याबाबत भारतीय हवामान विभागाने मान्सून ( mansun update ) बाबतीत नवीन अपडेट देताना मान्सूनसाठी पुढील वाटचालीसाठी अनुकूल वातावरण निर्माण झाल्याचे सांगितले आहे. यामुळे खोळंबललेला मान्सून पुन्हा सक्रिय होणार असल्याने हे दिलासादायक बातमी आहे.
उन्हाळा संपला की, सर्व भारतीयांना उत्सुकता असते मान्सून कधी येणार? याचे कारणही म्हत्वाचे असून भारत कृषीप्रधान देश असल्याने याला अधिक महत्त्व आहे. बाजारपेठेवरही शेती उत्पन्नाचा मोठा परिणाम पडतो. देशाचा विचार केला तर १ जून पर्यंत भारतात केरळ मार्गे मान्सूनचे आगमन होते. महाराष्ट्राचा विचार केला तर ७ जून पर्यंत मोसमी पाऊस सुरू होतो. यावर्षी वेळेआधीच मान्सून येणार असे अंदाज दिले गेले परंतु बिपरजॉय या वादळाचा मान्सूनवर परिणाम झाला. १ जूनला केरळात येणार मान्सून ८ जूनला आलं. यानंतरही या वादळामुळे त्याचा प्रवास खोळंबला आहे. आज १९ जून असतानाही कुठेही समाधान कारक मोसमी पाऊस झाला नाही. पाऊस नसल्याने पेरण्या खोळंबल्या असून, खरीपात आपल्याकडील शेतकरी सोयाबीन, कापूस याच पिकांची निवड करतात. हे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पेरणी वेळेवर होणे अपेक्षित असते अन्यथा उशिरा झालेल्या पेरणीचा उत्पादनावर परिणाम होतो. यामुळे शेतकरी, व्यापारी, मजूर असे सर्व सामान्य लोकांच्या नजरा पावसाच्या प्रतिक्षेत आभाळाकडे लागलेल्या आहेत. पण पाऊस काही पडत नसल्याने चिंतेचे वातावरण आहे. मान्सून नेमका कधी सक्रिय होणार? याची उत्सुकता आहे. रविवारी मान्सून बाबतीत भारतीय हवामान विभागाने नवीन अपडेट ( mansun update ) दिले. हवामान विभाग पुणे चे के.एस. होसाळीकर यांनी ट्विट केले असून, त्यात मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी अनुकूल वातावरण निर्माण झाल्याचे सांगितले आहे. पश्चिम बंगाल, बिहार आणि दख्खन पठारासाठी ही स्थिती अनुकूल असून तीन दिवस ही स्थिती राहील असे म्हटले आहे.
पुढील चार दिवसांत मराठवाड्यात पाऊस
हवामान विभागाचे प्रादेशिक केंद्र मुंबई कडूनही पुढील चार दिवस विदर्भात उष्णता वाढण्याची तसेच मराठवाड्यात मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा अंदाज दिला आहे.
मान्सून खोळंबल्याने उष्णतेत वाढ
मान्सून खोळंबल्याने देशभरात उष्णतेची लाट पसरली असून, अनेक ठिकाणी लोकांच्या जिवाची लाहीलाही होत आहे. विदर्भ ( महाराष्ट्र ), आंध्र प्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड येथे उष्णतेचा त्रास जनतेला सहन करावा लागणार आहे. तर आसाम आणि अरुणाचल प्रदेशमध्ये गर्मी जाणवू शकते.