mango india- गावरान आंब्याचे शनिवारी केज येथे प्रदर्शन
लोकगर्जनान्यूज
केज : खेड्यापाड्यात दिसनाऱ्या गावरान अंब्याची ( mango india ) ची जागा केसर, कलम,निलम अशा अनेक संकरीत अंब्यांनी घेतली आहे. अंबा लावण्यासाठीही संकरीत वाणालाच पसंती मिळत आहे. यापेक्षाही गावरान आंबे सरसर वाण टिकून रहावे तसेच गावरान आंबे जोपासणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी केज रोटरी ( kaij rotary ) कडून यावर्षीही शनिवारी ( दि. 3 ) जून सकाळी 9 ते 11 तालुकास्तरीय गावरान आंबे प्रदर्शन आयोजित केले आहे. या प्रदर्शनात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन संयोजकांनी केले.
गावरान आंबे ( mango india ) आंबराई हे पूर्वजांनी जोपासलेला किंमती वारसा आहे. त्यामुळे गाव पातळीवर आम्हाला अत्यंत वेगवेगळे व चविष्ट आणि गोड आंबे खायला मिळायचे मात्र अलीकडील काळात गाव पातळीवर असणाऱ्या या गावरान आंब्याचे वाण आमच्या दुर्लक्षामुळे ऱ्हास पावत असून त्यास वाचवण्यासाठी केज रोटरीने ( kaij rotary ) प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी तालुका व परिसरातील गावरान आंबेधारक शेतकरी यांच्यासाठी येत्या 3 जून सकाळी 9 ते 11 या वेळेत केज बसस्थानकासमोर मुख्य रस्त्याच्या उत्तर बाजूस गावरान आंब्याचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यांत आले असून केज तालुका व परिसरातील शेतकरी व गावरान आंबे धारकांनी मोठया संख्येने या प्रदर्शनात सहभागी व्हावे असे आवाहन रोटरी क्लब ऑफ केज चे अध्यक्ष पशुपतीनाथ दांगट (7744017999), सचिव सूर्यकांत चवरे(9860651023), संस्थापक अध्यक्ष हनुमंत भोसले (9423733888), प्रोजेक्ट चेअरमन रो बापूराव सिंगण(9422236139), रो अरुण अंजाण (9325023790) रो श्रीराम देशमुख , रो बापूराव वाळके(9421279831) व सर्व सदस्यांनी केले आहे. नांव नोंदणी, अधिक माहिती व सहभागासाठी वरील पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. या प्रदर्शनात पहिल्या तीन विजेत्यांना प्रमाणपत्र व पारितोषिके 5 जून पर्यावरण दिनाचे औचित्य साधून देण्यात येतील.या प्रदर्शनात परीक्षक म्हणून केज रोटरीचे रो डॉ प्रा बी जे हिरवे, रो महेश जाजू, रो प्रकाश कामाजी, रो श्रीमंत यादव, रो अरुण नगरे आणि केज कृषी खात्याचे अधिकारी हे राहणार आहेत. तरी जास्तीत जास्त आंबा प्रेमींनी या प्रदर्शनात सहभाग नोंदवावा असे आवाहन केज रोटरीच्या वतीने करण्यात आले आहे.