kusum yojana maharashtra- शेतकऱ्यांनो सौर पंपासाठी ऑनलाईन अर्ज सुरू

लोकगर्जनान्यूज
शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरलेली पी.एम. कुसुम सौरऊर्जा योजना ब साठी ऑनलाईन अर्ज भरण्यात येणारे पोर्टल सुरू झाले. बुधवार ( दि. १७ ) यासाठी ऑनलाईन अर्ज भरणे सुरू झाले आहे. कोठा संपताच सदरील पोर्टल बंद होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी सौर पंपासाठी अर्ज करावेत.
महाराष्ट्रातील विजेची अवस्था पहाता शेतकरी मेटाकुटीला आला. कशीबशी आठ तास वीज मिळते त्यासही योग्य दाब नसतो त्यामुळे शेती पंप चालत नाही. तसेच अनेकवेळा रात्रीची वीज असते त्यामुळे पिकांना जगविण्यासाठी शेतकऱ्याला स्वतः चा जीव धोक्यात घालून पिकांना पाणी द्यावे लागते. यामुळे शेतकरी परेशान असून सौर ऊर्जा पंप ही शेतकऱ्यांसाठी मोठा आधार व फायदेशीर आहे. परंतु हा पंप घेणं प्रत्येक शेतकऱ्यांना शक्य नाही. वीजेवरील भार कमी व्हावा तसेच ज्या ठिकाणी वीजपुरवठा पोचत नाही अशा ठिकाणी शेतकऱ्यांना शेतीला पाणी देता यावं म्हणून शासनाने महाकृषी उर्जा अभियान अंतर्गत पी.एम. कुसुम योजना ( kusum yojana maharashtra )सुरू करण्यात आली. यातून शेतकऱ्यांना ३,५,७.५ एचपीचे सौर ऊर्जा पंप देण्यात येतात. यासाठी खुल्या वर्गातील शेतकऱ्यांना १० टक्के तर अनुसूचित जाती व जमातीच्या शेतकऱ्यांसाठी ५ टक्के रक्कम भरणे अपेक्षित आहे. परंतु या सौरऊर्जा पंपाचा कोठा कमी असल्याने तो सुरू कधी होतो अन् संपतो याची शेतकऱ्यांना माहिती मिळत नाही. कुसुम घटक ब योजनेचे कृषी पंप साठीची ऑनलाईन ( kusum yojana maharashtra) अर्ज करण्यात येणारे पोर्टल बुधवारी ( दि. १७ ) सुरू झाले. इच्छुक शेतकऱ्यांनी तातडीने अर्ज भरावेत. यानंतर शेतकऱ्यांच्या क्षेत्रा नुसार त्यांना ३,५,७.५ मंजूर होईल. खुला वर्गासाठी १० टक्के रक्कम ३ एचपी १९ हजार ३८०, ५ एचपी २६ हजार ९७५, ७.५ एचपी ३७ हजार ४४० तर अनुसूचित जाती जमातीसाठी ५ टक्के ३ एचपी ९ हजार ६९०, ५ एचपी १३ हजार ४८८, ७.५ एचपी १८ हजार ७२० अशी रक्कम भरावी लागणार आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाच्या अधिकृत वेबसाइटवरून आपले ऑनलाईन अर्ज भरावेत. इतर वेबसाईटचा वापर करु नये असे आवाहन केले. तसेच याबाबत अधिक माहिती व अर्ज भरण्यासाठी www mahaurja.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.