kaij Crime- केज तालुक्यातील एका गावात दारु पाजून कुऱ्हाडने हल्ला; दुसऱ्या ठिकाणी दुचाकी चोरीला
लोकगर्जनान्यूज
केज : दारू पाजून कुऱ्हाडीने व चाकुने वार करून रक्तबंबाळ केल्याची घटना केज पोलीस ठाणे हद्दीत घडली. याप्रकरणी दोघा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तर एका हॉटेलच्या समोर उभी असलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लंपास केली.
विनोद अरुण केदार रा. एकूरका ( ता. केज ) याला ( दि. १ ) फेब्रुवारी साहेबराव फुलचंद नागरगोजे याने दारू पाजून सायंकाळी ६ च्या सुमारास लाथाबुक्याने मारहाण केली. तसेच डोक्यात कुऱ्हाडीने मारुन रक्तबंबाळ करुन कुऱ्हाडीचे लाकडी दांड्याने पाठीत, हाताला, कंबरेला, मांडीला व पायाला मारुन मुक्का मार दिला. चाकुने उजव्या पायाच्या पोटरीत मारुन जखमी केले. शिवीगाळ करुन जीवे मारण्याच्या धमकी दिली.या आशयाची विनोद अरुण केदार यांनी तक्रारी दिली. त्यावरुन ( दि. ४ ) शनिवारी केज पोलीस ठाण्यात साहेबराव फुलचंद नागरगोजे व त्याची पत्नी भाग्यश्री साहेबराव नागरगोजे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस नाईक उगलमुगले हे पुढील तपास करीत आहेत.
मस्साजोग येथून प्राध्यापकाची दुचाकी लंपास
प्रा. अशोक रावसाहेब भोसले यांनी ( दि. ४ ) केज-बीड महामार्गावर मस्साजोग येथील पंजाब देशमुख यांच्या हॉटेल समोर उभी केलेली काळ्या रंगाची स्प्लेंडर प्लस दुचाकी क्र. एम एच-४४ ए-८०१ सायंकाळी ६०० वाजण्याच्या सुमारास चोरीला गेली आहे. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरुद्ध गु. र. नं. ६१/२०२३ भा. दं. वि. ३७९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस नाईक सोनवणे हे पुढील तपास करीत आहेत.