Kaij-हृदयद्रावक! सातवीच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या
वडील कोरोनात वारले तर आईने दुसरं लग्न केले आत्या करतं होती सांभाळ
लोकगर्जनान्यूज
केज : इयत्ता ७ वर्गात शिक्षकन घेत असलेल्या विद्यार्थ्यांने रहात्या घरा शेजारी असलेल्या गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना केज तालुक्यातील चिंचोलीमाळी येथे उघडकीस आली. या हृदयद्रावक घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दिपक ( दिप ) सचिन अकलूजकर ( वय १४ वर्ष ) असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे. हा मुळचा बार्शी येथील आहे परंतु कोरोना काळात वडील सचिन अकलूजकर यांचे निधन झाले. यानंतर आईनेही दुसरं लग्न केलं. एकटा पडलेल्या दिपक यास आत्याने चिंचोलीमाळी येथे घेऊन आली. येथे त्यास शाळेत प्रवेश देऊन सांभाळ करत होत्या. गुरुवारी ( दि. २१ ) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास आत्याच्या रहात्या घरा शेजारी असलेल्या गोठ्यात दिपक ( दिप ) अकलूजकर याने आडूला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी मयताचे मामा यांनी दिलेल्या खबरे वरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दिपक हा शाळेतील हूशार व मनमिळाऊ स्वभावाचा यामुळे ही घटना समजताच हळहळ व्यक्त केली जात आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.