Kaij- स्वप्नपूर्तीच्या दिशेने पहिले पाऊल; उद्या ५ कोटींच्या विकास कामांचा शुभारंभ
उद्घाटक म्हणून आमदार नमिता मुंदडा उपस्थित रहाणार

लोकगर्जनान्यूज
केज : शहराचा विकासाला चालना मिळावी शहरवासीयांना मुलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी हारुन इनामदार यांचे प्रयत्न सुरू होते. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून उद्या बुधवारी ( दि. २९ ) शहरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा आयोजित केला. यावेळी अध्यक्षस्थानी रमेश आडसकर तर उद्घाटक म्हणून आमदार नमिता मुंदडा उपस्थित रहाणार आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित रहाण्याचे आवाहन हारुन इनामदार व नगर पंचायत पदाधिकाऱ्यांनी केले.
केज शहरातील ५ कोटींच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण आणि बांधकाम मजुरांना कीट वाटप कार्यक्रम उद्या बुधवारी ( दि. २९ ) सकाळी साडेदहा वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थितीत नगरपंचायत मैदानावर करण्यात आला.यानंतर आमदार नमिता मुंदडा यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या ७६ कोटींच्या विकास कामांचा शुभारंभ येत्या काही दिवसांत होणार आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने केजच्या विकासाला सुरुवात झाली आहे. पुढील पाच वर्षांत सर्वांच्या सहकार्याने केज शहराचा चेहरामोहरा बदलणार असल्याचे हारुन इनामदार यांनी म्हटले आहे. या कामांचे उदघाटन आमदार नमिता मुंदडा यांच्या हस्ते तर, अध्यक्षस्थानी भाजपा नेते रमेश आडसकर रहाणार आहेत. यावेळी जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, नगराध्यक्षा सीता बनसोड, हारून इनामदार, अंकुश इंगळे, काँग्रेसचे युवा नेते आदित्य पाटील, ज्येष्ठ नेते सुरेश पाटील, रत्नाकर शिंदे, विजयकांत मुंडे, पशुपतीनाथ दांगट, भगवान केदार, डॉ. वासुदेव नेहरकर, दीपक कांबळे, महादेव सूर्यवंशी, उपविभागीय अधिकारी शरद झाडके, तहसीलदार दुलाजी मेंडके, केशव कदम, युवराज काळे, राजू इनामदार, रामचंद्र गुंड यांच्यासह आदी उपस्थित राहणार आहेत.