Kaij -लाईनमनला मारहाण;शासकीय कामात अडथळ्याचा गुन्हा दाखल
लोकगर्जनान्यूज
केज : सेवेवर असताना महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्याला मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी एका आरोपी विरुद्ध धारुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आडस ( ता. केज ) येथील कनिष्ठ अभियंता कार्यालय महावितरण कंपनी मधील कनिष्ठ तंत्रज्ञ म्हणून कार्यरत असलेले सुदर्शन हनुमंत काळे ( वय ३६ वर्ष ) यांना सोमवारी ( दि. १८ ) विद्युत तारेवर आकडा टाकल्याचा दिसून आला. काळे यांनी संबंधित व्यक्तीला आकडा काढून घ्या म्हणून विनंती केली. या कारणावरून दोघांमध्ये मांडणाला सुरुवात झाली. याचे पर्यवसान मारामारी पर्यंत गेले. यामध्ये महावितरण कंपनीचे कर्मचारी यांचा गणवेशाचा खिसा फाडून, चापट मारुन जिवे मारण्याची धमकी दिली. या आशयाची फिर्याद कनिष्ठ तंत्रज्ञ सुदर्शन हनुमंत काळे यांनी दिली. त्यावरुन धारुर पोलीस ठाण्यात आरोपी माणिक साहेबराव वाघमारे रा. एकता नगर,आडस ( ता. केज ) याच्या विरोधात शासकीय कामात अडथळा केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा अधिक तपास धारुर पोलीस ठाणे प्रभारी सपोनि विजय आटोळे हे करत आहेत.