Kaij -मराठा आरक्षण ,पीकविमा प्रश्नी महिलांची जनजागृती ग्रामफेरी
लोकगर्जनान्यूज
केज : तालुक्यातील आनंदगाव येथे मंगळवार ( दि . ५ ) मराठा समाजाला आरक्षण द्यावे, आंतरवली येथील लाठीचार्ज घटनेचा निषेध, शेतकऱ्यांना पिक विमा, अनुदान तात्काळ खात्यावर वर्ग करावा या मागण्यासाठी महिलांनी जनजागृती ग्रामफेरी काढली.
यावेळी घोषणाबाजी करत मराठा समाजाला आरक्षण द्या, शेतकऱ्यांना १०० टक्के पीकविमा,अनुदान द्या जालना येथील घटनेचा निषेध केला.आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. गावात स्वयंस्फूर्तपने कडकडीत बंद पाळण्यात आला.
आनंदगाव ग्रामस्थ च्या वतीने ग्रामपंचायत चे ग्रामसेवक एस. एल. हेडगिरे यांना सरपंच अंजना गायकवाड, उपसरपंच आशाबाई शिंदे व गावातील महिला यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले. ग्रामफेरीस गावातील ग्रामस्थ,महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.