क्राईम

Kaij-पोलीसांवर भरचौकात हल्ला 9 जणांवर गुन्हा दाखल

आरोपीला घेऊन जाताना जमावाने लोखंडी रॉड, दगडाने गाडीच्या काचा फोडून केली मारहाण

लोकगर्जनान्यूज

केज : एका गुन्ह्यातील आरोपीला चौकशीसाठी ताब्यात घेऊन जाताना पाठलाग करुन पोलीस वाहनाच्या काच फोडून कर्मचाऱ्यांना मारहाण करत आरोपीला वाहनाच्या खाली ओढण्याचा प्रयत्न केला. सदरील प्रकार शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात घडला आहे. याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

जामखेड ( जि. अहमदनगर ) येथील पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार ज्ञानेश्वर बेल्हेकर आणि त्यांचे सहकारी पोलिस हवालदार प्रविण इंगळे, पोलिस शिपाई कुलदिप घोळवे हे स्कार्पिओ या वाहनाने क्र. MH 16 CV 5555 ने आरोपीच्या शोधात केज येथे आले. केज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वाघमारे यांना सोबत घेऊन जामखेड पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपी प्रतिक भैरवनाथ चाळक यास तपासकामी ताब्यात घेण्यासाठी लव्हूरी येथे गेले. तेव्हा प्रतिक चाळक आणि त्याचे साथीदार मिळून वाढदिवस साजरा करीत होते. त्या नंतर दि. १६ फेब्रुवारी रोजी दुपारी 2 च्या सुमारास जामखेड पोलीस त्यांच्या खाजगी वाहनाने आरोपी प्रतीक चाळक यास घेऊन जाताना काही जणांनी स्कॉर्पिओ क्र . MH 44 Z 2300 याने पाठलाग करून केज येथील शिवाजी चौकात गाडी आडवी लावून पोलीसांची गाडी अडविली . यावेळी जमावातील एकाने हातातील लोखंडी रॉड व दगड पोलिसांच्या गाडीवर मारून काच फोडली. आतील पोलीस हवालदार प्रवीण इंगळे यांचे गचुरे धरून मारहाण केली. तसेच पोलीस हवालदार ज्ञानेश्वर बेल्हेकर यांना चापटाने मारहाण करुन पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपी प्रतिक चाळक यास बाहेर ओढण्याचा प्रयत्न करुन सरकारी कामात अडथळा निर्माण केला. पोलीस शिपाई कुलदीप घोळवे यांना देखील चापटाने मारहाण करुन त्यांच्या गाडीचा खाजगी चालक विशाल कांबळे याला बाहेर ओढण्याचा प्रयत्न केला.यावेळी पोलीस गाडीच्या चालकाने शिताफीने त्यांची गाडी केज पोलीस ठाणेचे गेट मधुन आतमध्ये नेल्याने अनर्थ टळला. याप्रकरणी पोलीस हवालदार बेल्हेकर यांच्या फिर्यादी वरुन ( दि. १६ ) केज पोलीस ठाण्यात आरोपी अभिषेक सावंत, ईश्वर चाळक, राहुल चाळक, सौरभ चाळक, रोहीत चाळक, मुन्ना बचाटे सर्व रा. लहुरी ता. केज अन्य तीन अनोळखी इसम असे एकूण ९ जणांविरुद्ध सरकारी कामात अडथळा निर्माण केला यासह अन्य कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »