Kaij- चार दिवसांपासून वीजपुरवठा बंद असल्याने महिलांचा घागर मोर्चा
केज : तालुक्यातील तांबवा येथे मागील चार दिवसांपासून वीजपुरवठा खंडित असल्याने ग्रामस्थांना पिण्याचे पाणी,दळण मिळत नसल्याने संतप्त महिलांनी घागर मोर्चा काढून महावितरण कार्यालयाला घेराव घातला आहे. महिलांमधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
केज शहरसह तालुक्यातील वीजपुरवठा मागील तीन महिन्यांपासून विस्कळीत झाला. येथील ३३ के.व्ही. केंद्रातील मुख्य ट्रान्सफॉर्मर जळाला तेंव्हा पासून वीजपुरवठा सुरळीत नाही. तो ट्रान्सफॉर्मर बसला परंतु नेहमीच काहींना काही बिघाड होत असल्याने वीजपुरवठा खंडित होतो आहे. तो कधी येईल याची खात्री नाही. याचे जिवंत उदाहरण तालुक्यातील तांबवा या गावावरून दिसून येते. येथील चार दिवस झाले वीजपुरवठा खंडित असल्याचे आंदोलक महिलांचे म्हणनं आहे. चार दिवसांपासून आम्हाला पिण्यासाठी पाणी नाही, यामुळे आम्हाला वेळेवर पाणी व वीज द्यावी या मागणीसाठी महिलांनी महावितरण कार्यालयावर घागर मोर्चा काढून अधिकाऱ्यांनी घेराव घातला आहे. यामुळे महावितरण कार्यालयात परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.