Kaij-केज तालुक्यातील ‘हा’ रस्ता वर्षभरापासून उखडून ठेवल्याने अनेक अपघात
गुत्तेदारांवर कारवाईची मागणी
केज : आनंदगाव सोनीजवळा रस्ता
नवीन डांबरीकरण होणार मंजुरी आली असल्याचे सांगत गुत्तेदाराने आनंदगाव सोने जवळा रस्ता गेल्या एक वर्षभरापासून उखडून ठेवला आहे यामुळे आतापर्यंत अनेक अपघात झाले आहेत.
प्रसूतीसाठी घेऊन जाताना एका बाळाला जीव गमावा लागला आहे.
ऊस वाहतूक करणाऱ्या गाडीच्या बैलाला जीव गमवावा लागला आहे. रहदारीस अडथळा निर्माण होतो आहे दुचाकी चार चाकी बैलगाडी ,पायी चालणे कठीण झाले आहे. आठ दिवसाचे आत काम सुरू न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग गुत्तेदारावर मेहरबान असल्याने वारंवार मागणी करूनही गुत्तेदार कोणाला जुमानत नाहीत बजेट नाही करता येईल पाणी नाही अशा प्रकारची उडवा उडवी चे उत्तरे देतात.
रस्ता पूर्ववत करून द्या
पूर्वीचा थोडा बरा असलेला रस्ता गुत्तेदाराने उकडून ठेवलेला आहे त्यावर ना दबई केली नाही. योग्य प्रकारची खडी मुरूम टाकण्यात आलेला नाही केवळ वरून थातूरमातूर उकडून ठेवन्यात आलेला आहे. नवीन रस्ता करायचा नसल्यास किमान पूर्ववत जसा रस्ता होता तसा
करून द्या अशी नागरिकांची मागणी आहे.
अपघात झाल्यास गुत्तेदारावर गुन्हा दाखल करण्यात यावा
दुचाकी चालवताना या रस्त्यावर अनेक वेळा अपघात होऊन हात ,पाय फॅक्चर झाले आहेत. अनेकांना दवाखान्यामध्ये लाखो रुपये खर्च करावे लागले आहेत केवळ गुत्तेदार आणि रस्ता उकडून ठेवल्याने ही अपघात होत आहेत यापुढे अपघात झाल्यास गुत्तेदारावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी नागरिकांनी करत आहेत.
प्रसूतीसाठी घेऊन जाताना पोटातच बाळ दगावले
शेतात राहणाऱ्या एका महिलेला प्रसूतीसाठी रिक्षा घेऊन जात असताना प्रवासादरम्यान रस्त्यावरील दगडांच्या अडथळ्यांमुळे त्या आईचे मूल पोटातच दगावले असल्याची घटना मागील काही दिवसांपूर्वी घडली आहे
रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी नेमका विलंब का होतो आहे?
वर्षभरापासून रस्ता उकळून ठेवून अद्याप केला जात नाही त्यास विलंब केला जातो आहे याचे नेमके कारण स्पष्ट होत नाही. अधिकाऱ्यांनी तात्काळ गुत्तेदावर कारवाई करून रस्ता तयार करून द्यावा अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.