Kaij-आडस येथे विज कोसळली;शेतकऱ्याचे नुकसान
लोकगर्जनान्यूज
केज : तालुक्यातील आडस येथे विज कोसळल्याने एक शेळी दगावली तर दोन गंभीर जखमी झाल्याची घटना आज शनिवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
वैजनाथ दगडुअप्पा आकुसकर रा. आडस ( ता. केज ) यांची अंबाजोगाई रस्त्यावर शेती आहे. ते शेतात असताना दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास विजेच्या कडकडाट सह पाऊस सुरू झाला. यामुळे शेतात चरत असलेल्या तीन शेळ्या बाभळीच्या झाडाखाली थांबल्या होत्या. यावेळी अचानक विज कडाडून बाभळीच्या झाडावर कोसळली, याचा धक्का लागून एक शेळी जागीच दगावली आहे तर दोन शेळ्या गंभीर जखमी झाल्या आहेत. सकाळपर्यंत या जखमी शेळ्या जगतील म्हणून खात्री देता येत नसल्याची माहिती शेतकरी आकुसकर यांनी दिली. एक शेळी दाखवल्यामुळे शेतकऱ्याचे १५ ते २० हजारांचे आर्थिक नुकसान झाले. घटनेची माहिती तलाठी यांना देण्यात आली.