Kaij- अल्पवयीन मुलाच्या अपहरणाने खळबळ
लोकगर्जनान्यूज
केज : तालुक्यातील एका 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलाच्या अपहरणाचा प्रकार घडला असून, यामुळे केज ( kaij ) तालुक्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अपहरण झालेल्या मुलाच्या पालकाच्या तक्रारीवरून केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
समजलेली अधिक माहिती अशी की, सुमित विकास रोडे ( वय 17 वर्ष ) रा. मस्साजोग ( ता. केज ) हा मुलगा ( दि. 2 ऑगस्ट ) सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास मोबाईलचे चार्जर घेण्यासाठी केज ( kaij ) येथे आला. परंतु घरी परत न आल्याने कुटुंबाने शोध सुरू केला. दुसऱ्या दिवशी अनेक ठिकाणी व वेगवेगळ्या शहरात शोधूनही मिळून आला नाही. यामुळे अपहरण झालेल्या मुलाचे वडील विकास रोडे यांनी पोलिसांत मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार दिली. या तक्रारीवरून केज पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. अल्पवयीन मुलाचे अपहरण झाल्याची बातमी पसरताच केज तालुक्यात खळबळ उडाली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.