IAS अधिकारी सुनील केंद्रेकर यांच्या निर्णयाने आश्चर्याचा धक्का
लोकगर्जनान्यूज
विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर ( IAS ) यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली असून, या निर्णयामुळे मराठवाड्यातील जनतेला आश्चर्याचा धक्का बसला आहे.
धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी, आपल्या पदाचा गर्व न बाळगता सामान्य जनतेत मिसळणारा व कोणाचीही भीडभाड न करता नियमानुसार धडाकेबाज काम करणारा अधिकारी म्हणून सुनील केंद्रेकर ( IAS ) यांची ओळख आहे. बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असताना त्यांनी गाजवलेली कारकीर्द येथील जनता विसरलेली नाही. येथून बदली झाली ( करण्यासाठी भाग पाडले ) तेव्हा येथील जनता त्यांच्या बदलीच्या विरोधात रस्त्यावर उतरली होती. यानंतर त्यांची बदली बऱ्याच ठिकाणी झाली परंतु २०१९ ला त्यांनी औरंगाबाद विभागीय आयुक्त म्हणून पदभार घेतला. शेतकऱ्यांना पेरणीसाठी १० हजार रुपये अनुदान देण्याची शिफारस हे प्रकरण चांगलेच गाजले आहे. सेवेचे दोन अडीच वर्ष बाकी असताना त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्याने आश्चर्याचा धक्का बसला आहे. मागील महिन्यात केंद्रेकर यांनी स्वेच्छानिवृत्तीचा शासनाकडे अर्ज केला होता तो आज मंजूर करण्यात आला.