HSC BOARD EXAM परीक्षा मंडळाचा गोंधळ इंग्रजी पाठोपाठ हिंदीच्या पेपरमध्ये चूक

लोकगर्जनान्यूज
बीड : सध्या १२ HSC BOARD EXAM च्या परीक्षा सुरू असून पहिल्या दिवशी इंग्रजी विषयाच्या पेपर मध्ये चूक आढळून आली. त्यानंतर बुधवारी ( दि. २२ ) हिंदी विषयाचा पेपर होता. यामध्ये चूक आढळून आल्याने परीक्षा मंडळाचा गोंधळ सुरू असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. याचा विद्यार्थी व पालकांना त्रास होत आहे.
दि. २१ फेब्रुवारी पासून राज्यात इयत्ता १२ च्या HSC BOARD EXAM परीक्षा सुरू आहेत. पहिला पेपर हा इंग्रजी विषयाचा होता. यामध्ये प्रश्ना ऐवजी चक्क उत्तरच छापून आल्याची चूक निदर्शनास आली. इतरही दोन प्रश्नच नव्हते. यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. तर काय लिहावे यामुळे मनस्ताप सहन करावा लागला. या प्रकारानंतर बुधवारी ( दि. २२ ) हिंदी विषयाचा पेपर होता. या प्रश्नपत्रिकेत प्र . क्रमांक २ मध्ये विरुद्ध अर्थी चार शब्द लिहायचे होते. या प्रश्नाला १,२,३,४ नंबर देणं आवश्यक असताना १,२,१,२ असे नंबर होते. चे शब्द देण्यात आले त्यांना १,२,३,४ असे नंबर देणे आवश्यक असताना चारही शब्दांना १,१, असे चारही शब्दांना नंबर दिले. हे उत्तर लिहिताना प्रश्न क्रमांक लिहून परीक्षार्थींना उत्तर लिहायच असतं नंबर मध्ये घोळ झाल्याने परीक्षा मंडळाच्या गोंधळामुळे परीक्षार्थी विद्यार्थी गोंधळून गेले. यामुळे गुण कसे मिळणार असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. हा परीक्षा मंडळाचा घोळ कधी संपणार असा प्रश्न पालक विचारत आहेत.