govt job vacancy-जि.प. भरले जाणाऱ्या पदांच्या लेखी परीक्षेचं स्वरूप ठरलं: याबाबत सविस्तर माहिती

लोकगर्जनान्यूज
राज्यात जिल्हा परिषदेच्या अधिकारी, कर्मचारी अशा सर्व हजारो ( govt job vacancy ) रिक्त पदांची भरती होणार आहे. याबाबत महाराष्ट्र शासनाने आधीच घोषित केले. यासाठी घेण्यात येणाऱ्या लेखी परीक्षेचा आराखडा ( स्वरूप ) ठरले आहे. ही बाब समोर आली या परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जाणार? परीक्षा किती मार्क ची असेल, प्रश्न व वेळ किती? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी ही बातमी तुम्हाला पुर्ण वाचावी लागेल.
राज्यातील जिल्हा परिषदेच्या 18 हजार 939 रिक्त पदे भरण्यात येणार असल्याचे घोषित करण्यात आले. यासाठी जोरदार प्रयत्न सुरू असून एका कंपनीला याचे कामही देण्यात आले. परंतु यासाठी घेण्यात येणारी लेखी परीक्षेचे स्वरूप कसे असावे? या परीक्षा कोणत्या धर्तीवर घेण्यात यावी यासाठी ग्रामविकास खात्याने त्यांच्याच खात्यातील उच्च शिक्षित व अनुभवी अधिकाऱ्यांच्या एकूण सहा समित्या गठीत केलेल्या होत्या. या समित्यांनी अभ्यास करुन मागील एप्रिल महिन्यात 28,29 तारखेला या सर्व समितीच्या अधिकाऱ्यांची पुणे येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत लेखी परीक्षेला रुप देण्यात आले. यामुळे शासकीय नोकरी ( govt job ) च्या प्रतिक्षेत असणाऱ्यांना आता दिलासा मिळाला असून, राज्यात 2016 पासून पद भरती झालेली नाही. त्यामुळे अनेक सुशिक्षित बेरोजगार तरूण ( govt job vacancy ) जागा भारतीची जाहिरात कधी निघणार याकडे डोळे लावून बसले होते. यापूर्वीही दोन वेळा पद भरतीची घोषणा झाली परंतु पद भरती झालेली नाही. त्यामुळे यावेळीही घोषणा झाली पण जागा भरणार की, नाही. याची खात्री नव्हती परंतु आता परीक्षेचे स्वरूप समोर आले याची जोरदार तयारी सुरू असल्याचे समोर आल्याने बेरोजगार तरुणांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
स्पर्धा परीक्षेच्या धर्तीवर प्रश्नपत्रिका !
जिल्हा परिषद रिक्त पद भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या संभाव्य लेखी परीक्षेसाठी प्रश्नपत्रिका या स्पर्धा परीक्षेच्या धर्तीवर काढण्यात येणार आहे. संवर्ग निहाय वेगवेगळ्या प्रश्न पत्रिका काढल्या जातील. यासाठी दहावी, बारावी, पदवी आणि संबंधित पदाच्या व्यावसायिक अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न विचारले जाणार आहेत.
प्रश्नांची संख्या,गुण, वेळ किती?
या परीक्षेसाठी एकूण प्रश्न संख्या ही शंभर रहाणार असून, प्रत्येक प्रश्न 2 गुणांचा असे ऐकून 200 गुणांचा पेपर असेल. हा पेपर सोडविण्यासाठी 2 तासांची वेळ परीक्षार्थींना देण्यात येणार आहे.
परीक्षेचे चार प्रकार
या लेखी परीक्षे संदर्भात चार प्रकार निश्चित करुन त्या प्रकारांना अनुक्रमांक देण्यात आले. जसे ‘अ’ या प्रकारात 11 पदे, दुसरा प्रकार ब 1 या प्रकारात 10 पदे, तिसरा प्रकार ब 2 या प्रकारात 1 पद, चौथा प्रकार ‘क’ असून या प्रकारात विविध १७ प्रकारची पदे भरली जाणार असून असे एकूण विविध प्रकारचे 39 पदे भरली जाणार आहेत.
असे असणार विषयानुसार प्रश्न व गुण
इंग्रजी -15 प्रश्न (30 गुण),मराठी -15 प्र. (30 गुण),गणित व बुद्धिमापन -१५ प्र. (30 गुण), सामान्य ज्ञान -15 प्र. (30 गुण), तांत्रिक प्रश्न – 40 प्र. (80 गुण) असे एकूण 100 प्रश्न 200 गुणांचे असणार आहेत.